- सामाजिक कार्यकर्ते संजय बघेले यांच्या पाठपुराव्यानंतर अवैध विटभट्टी धारकांना नोटीस
गोरेगाव, दी. 31 जानेवारी : गोंदिया येथील अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिनांक : 30/04/2024 रोजी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये, वेगवेगळ्या 8 प्रकरणाचे अपील आदेश काढले असून यात एकूण 11 लाख 32 हजार 380 रुपयांचे दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश तहसीलदार गोरेगाव यांना 7 दिवसाचे आत वसूल करावी असे स्पष्ट आदेश पारित केले, परंतु तहसीलदार गोरेगाव यांनी आज दिनांक 31/01/2025 रोजी पर्यन्त दंडाची रक्कम संबंधितांकडून वसूल केली नाही. याचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश बघेले यांनी केला आहे.
- 18 लाख 49 हजार 320 रुपये दंडाची रक्कम वसूल केली नाही
संजय बघेले यांनी सांगितले की, गोरेगाव तालुक्यातिल ग्राम डववा, सटवा, तुमखेडा, येथे वीट भट्टी करिता वापरण्यात येणारे माटी चे अवेध रित्या उत्खनन करून विटा तय्यार केल्या प्रकरनी मी अर्जदार महसूल विभागाकडे लेखी तक्रार केली होती, या प्रकरणात एकूण 30 वीट भट्टी धारकांवर तहसीलदार गोरेगाव यांनी कारवाई केली होती, ही कारवाई सन 2020 -21 – 22 या कालावधीत करण्यात आली होती, दरम्यान दंडाची रक्कम 29 लाख 81 हजार 700 रुपये एवढी आकारण्यात आली होती. परंतु यातील तब्बल 22 प्रकरण तहसीलदार गोरेगाव यांनी दाबून धरले होते, याची माहिती दिनांक : 08,01,2025 रोजी प्राप्त झालेल्या महितीतून उघळ झाले, यातील तब्बल 18 लाख 49 हजार 320 रुपये दंडाची रक्कम वसूल केली नाही, याचाच अर्थ की तत्कालीन तहसीलदार व सध्या कार्यरत असलेले तहसीलदार गोरेगाव यांनी संबंधितांशी आर्थिक देवाण घेवाण केले असावे असा आरोप अर्जदार संजय बघेले यांनी केला आहे.
- तब्बल 9 महिन्याचा कालावधी लोटला तरी दंडाची रक्कम वसुल नाही
सदर प्रकरणात अप्पर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून तब्बल 9 महिणीचा कालावधी लोटला तरी तहसीलदार गोरेगाव यांनी दंडाच्या रकमेची वसुली केली नाही, परंतु आता सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश बघेले यांनी केलेल्या दंडाच्या रक्कमे संबंधात माहिती मागितली असता त्यांचे पितळ उघड पडले आहे. म्हणून माहितीचे अर्ज केल्या नंतर संबधित तहसीलदारांनी दिनांक 16/12/2025 रोजी दंडाची रक्कम वसूल करणे बाबत नोटीस काढले असून अध्याप कुठलीही कारवाई केली नाही. हे दिनांक 30/01/2025 रोजी अशलेल्या प्रथम अपील सुनावणी दरम्यान जन माहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार ( गौण खनिज ) अश्विनी नंदेश्वर यांनी सांगितले.
या प्रकारे जर प्रशासनात बसलेले अधिकारी आर्थिक संबंध जोपासत असतील तर शासनाच्या महसुलात कशी वाढ होईल याचा शोक सामाजिक कार्यकर्ते संजय बघेले यांनी मध्यमांशी बोलताना वेक्त केला, यास जबाबदार तत्कालीन तहसीलदार व कार्यरत तहसीलदार यांच्यावर सुद्धा त्यांना लागू असलेल्या सेवाशर्ती नुसार वरिष्ठाणी कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय बघेले यांनी केली आहे.
