मानवाचे जीवन मूल्यवान आहे, वाहन चालवताना हेल्मेट, व शीट बेल्ट चा वापर करावे : प्रशांत भुते

  • 34 वे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे समापन समारंभ

सडक अर्जुनी, दि. 31 : तालुक्यातील जिल्हा महामार्ग पोलीस मदत केंद्र डूगगीपार च्या वतीने आज दि. 31 जानेवारी रोजी 34 वे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे समापन समारंभ चे आयोजन (डोंगरगाव डेपो) येथे करण्यात आले होते, 01 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज 31 जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे समापन समारंभ चे आयोजन करण्यात आले, दरम्यान मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका आरोग्य अधिकारी प्रणय पाटील तर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भुते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंबाडे,  पोलीस उप निरीक्षक दिनेश लिल्हारे, हरिदास बोरकर संचालक अमृत पेट्रोल पम्प, संपादक बबलु मारवाडे, संपादक सुशील लाडे, पत्रकार राजेश मुणेश्वर, पत्रकार निलेश शाहारे, नितेश नागरिकर अशोका टोल प्लाझा रोड मेंटेनन्स चे ईन्चार्ज, सह आयटीया कॉलेज येथील विधार्थी व पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते, दरम्यान महमानवांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्याअर्पण करण्यात आली.

प्रसंगी मंचावरून बोलताना प्रशांत भुते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, यांनी मार्गदर्शन केले, ते म्हणाले दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापरावे ही जनजागृती व्हावी या साठी आम्ही मोफत हेल्मेट चे वाटप केले आहेत, त्याच बरोबर रक्तदान सीबिराचे आयोजन करण्यात आले होते, वाहन चालवताना काळजी घ्यावी जिल्ह्यात हत्या चे प्रकरण पेक्षा अपघाताचे प्रमाण ज्यास्त आहेत, याला मानवी चूक समजू मात्र ही चूक होता कामा नये, मानवाचे जीवन मूल्यवान आहे, म्हणून जनजागृति कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी शसनाच्या वतीने करण्यात येते.

प्रणय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, सडक अर्जुनी यांनी देखील जनजागृती पर मार्गदर्शन केले, ते म्हणाले दारू पिऊन गाडी चालवू नये, गाडी थांबवून फोन उचलावे, टर्न ओव्हरटेक करू नये, हेल्मेट चा वापर करावे, सीट बेल्ट चे नियमित वापर करावे, 18 वर्षाच्या नंतरच वाहन चालवावे, ड्रायविंग लायसन्स असावी, खबरदारी घेऊनच वाहने चालवावे त्या मुळे अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी, वाहन इन्शुरन्स आणि वाहन लायसन असेल तर अपघात झाल्यास आणि अपघातात एखादयाचा मृत्यु झाल्यास त्याची भरपाई मिळते, शेतकरी असल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा चा लाभ मिळते, त्या मुळे आपण आपले कर्तव्य पाळत काम करावे, रक्तदान नियमित करावे, त्याचा अपघाती नागरिकांना उपयोग होते, ओ निगेटिव्ह आणि ओ पाजिटीव्ह ब्लड धारकांनी नियमित रक्त दान करावे असेही आव्हाहन केले, यावेळी कार्यक्रमाचे संचालक पोलीस उप निरीक्षक दिनेश लिल्हारे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस उप निरीक्षक प्रशांत भुते यांनी केले. अशी कार्यक्रमांची सांगता झाली.

Leave a Comment

और पढ़ें