सरपंच हर्ष मोदी यांच्या हस्ते सौन्दड येथे विविध ठिकाणी ध्वजारोहन

  • जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे यांच्या हस्ते ही ध्वजवंदन.
  • संदीप मोदी यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांना गिफ्ट चे वाटप. 

सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दि. 26 जानेवारी : तालुक्यातील ग्राम सौन्दड येथे अनेक ठिकाणी स्वातंत्र्याचा 76 वा प्रजासत्तक दिन आज 26 जानेवारी रोजी ध्वजारोहन करून साजरा करण्यात आला, सर्व प्रथन सरपंच हर्ष मोदी, उपसरपंच कुंदाताई साखरे सह सर्व ग्राम पंचायत सदस्य सह गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायत येथे सरपंच हर्ष मोदी यांनी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहन केले त्याच बरोबर गावातील आरोग्य केंद्र येथे ध्वजरोहन केले, जिल्हा परिषद प्राथमिक नागरी शाळा 1 येथे सुद्धा ध्वजारोहन केले.

सौन्दड येथील जिल्हा परिषद हायस्कुल व जिल्हा परिषद नागरी शाळा केंद्र 2 येथे ध्वजारोहन संपन्न झाले, या वेळी अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले, यावेळी सरपंच हर्ष मोदी, उप सरपंच कुंदाताई साखरे, सह सर्व ग्राम पंचायत सदस्य, पोलीस पाटील सीमाताई निंबेकर, उधोजक संदीप मोदी, प.स. सदस्य मंजूताई डोंगरवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई राऊत, जी.प. हायस्कुल येथील मुख्याध्यापक के. के. मेश्राम, सहाय्यक शिक्षक सुनील भिमटे, जी.प. प्रा. शाळा नागरी चे मुख्याध्यापीका मालताताई कऱ्हाडे, जी. प. प्रा शाळा केंद्र चे मुख्याध्यापक नंदू जगनाडे सह शाळा वेवस्थापक समिती चे अध्यक्ष, सदस्य, सर्व शिक्षक वृंद सर्व ग्राम पंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, लहान मुलांनी नृत्य करीत आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले, 2024 मधे दहावी व बारावी च्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या मुलांना सौन्दड येथील युवा उधोजक संदीप मोदी यांनी गिफ्ट पारितोषिक चे वाटप केले, ते दर वर्षी मुलांना पारितोशिक देऊन प्रोत्साहित करतात, यावेळी सरपंच मोदी व निशा तोडाशे यांनी मंचावरून मार्गदर्शन करीत 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्या दिल्या.

Leave a Comment

और पढ़ें