सौन्दड, दि. 26 जानेवारी : शैक्षणिक सत्र 2024 – 25 अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा 02 सौन्दड येथे दोन दिवशीय स्नेहसंमेलन संपन्न झाले, स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा दिनांक 23 जानेवारी रोजी संपन्न झाला, उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष मंगेश काळे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन डूगगीपार सह गायत्री ईरले माजी सरपंच, कार्यक्रमाचे दीपप्रज्वन वर्षा शहारे यांनी केले, विशेष अतिथी म्हणून अनिल मेश्राम सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे होते, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी जी. प. सदस्य रूपाली टेंभुरने, प.स. सदस्य मंजू डोंगरवार, उपसरपंच भाऊराव यावलकर, ग्रा.प. सदस्य रंजु भोई, सदू विठ्ठले, विनोद पातोडे सह ग्रा.प. सदस्य उपस्थित होते, उपस्थित पाहुण्यांनी महा मानवाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्याअर्पण केले, तर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तर पाहुण्यांचे स्वागत लेझीम पथकाच्या कवायतीने करण्यात आले, त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, लघु नाटके, नक्कल सादर करण्यात आली, पालकांची संख्या बहुसंख्य होती, सदर कार्यक्रमासाठी शाळा वेवस्थापन समितीचे अध्यक्ष आसिफ बशीर शेख, उपाध्यक्ष पुजा मांडारकर, सदस्य दिगंबर ठोसरे, रवींद्र डोंगरवार, प्रतिभा गोटेफोडे, जितेंद्र राऊत, योगेंद्र बडोले, निशा कोहळे, यांनी सहकार्य केले, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापक जगनाडे, रघोर्ते सर, वलथरे मॅडम, मंगेश मेश्राम यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, सदर कार्यक्रमाचे संचालन मंगेश मेश्राम यांनी केलं तर मुख्याध्यापक जगनाडे यांनी आभार मानले, अनिल मेश्राम सह मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन करून मुलांचे कौतुक केले.
