लोहिया विद्यालयात प्रजासत्ताक दिन कार्यक्रम संपन्न.

सौंदड, दि. 26 जानेवारी : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुणादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६‌ जानेवारी रोजी विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

ध्वजारोहक व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जगदीश लोहिया, संस्थापक-संस्थाध्यक्ष लो.शि. संस्था, सौंदड यांनी संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले. त्याचबरोबर विद्यालयात सकाळी ८.१५ वाजता ध्वजारोहण केले. यावेळी प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून आ. न. घाटबांधे, उपाध्यक्ष, लो.शि.संस्था, प्रभुदयाल लोहिया, माजी जि. प. सदस्य व अध्यक्ष, वि.का.से. सह. संस्था सौंदड, पंकज लोहिया, सचिव लो. शि .संस्था, मा. मधुसूदन अग्रवाल, सहसचिव लो.शि. संस्था, रामचंद्र भेंडारकर, शमीम अ. सय्यद, डॉ. मारगाये, वसंताजी विठ्ठले, भजनदास बडोले, देवराव मासुरकर, महादेव लाडे, रीता राऊत ,प्राचार्या उमा बाच्छल, गुलाबचंद चिखलोंडे मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्ण, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांना स.शि.के. एस. काळे यांनी तंबाखू मुक्तची शपथ दिली, तसेच एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्यज्ञान स्पर्धेचे व भूगोल प्रज्ञाशोध परिक्षेचे बक्षीस, मेडल व प्रमाणपत्र माननीय अतिथिंच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

ध्वजारोहक व अध्यक्ष जगदीश लोहिया, संस्थाध्यक्ष लो. शि. संस्था यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजाऊन सांगितले व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयक मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या यांनी सुद्धा प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी सुद्धा गीत व भाषणातून देशभक्ती जागविली. कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्थेच्या सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यगण, निमंत्रित पाहुणे, पालक, गावकरी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता “वंदेमातरम” या गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन स.शि.कु. यू. बी. डोये यांनी केले तर आभार स. शि. टी. बी. सातकर यांनी मानले.

 

Leave a Comment

और पढ़ें