अध्यक्ष लायकराम भेंडारकर माजी आमदार राजेंद्र जैन यांचे आभार व्यक्त करताना.
- भाजप चा अध्यक्ष आणी राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष
गोंदिया, दि. 25 जानेवारी : गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांच अध्यक्ष आणी उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवडणूक दि. 24 रोजी पार पडली यात भाजप कॉग्रेस आणी राष्ट्रवादी कॉग्रेस तसेच अपक्ष उमेदवाराणी सर्वांनी दोन्ही उमेदवाराणा समर्थन देत निवडून दिले. यात भारतीय जनता पक्षाचे 30 राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांचे 8 आणी काँग्रेस पक्षाचे 13 आणी 2 अपक्ष असे एकूण 53 सदस्यानी अध्यक्ष आणी उपाध्यक्षाना बिनविरोध निवडून दिले.
भारतीय जनता पक्षाचे लायकराम भेंडारकर यांची अध्यक्ष म्हूणन तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश हर्षे यांची पुढील अडीच वर्षा करिता निवड करण्यात आली असून येत्या अडीच वर्षात जिल्यातील सामान्य लोकांची कामे सोडवू अशा विश्वास अध्यक्ष आणी उपाध्यक्षानी व्यक्त केला आहे.
लायकराम भेंडारकर यांच्या रूपाने अर्जुनी मोरगाव तालुक्याला तब्बल सतरा वर्षाने अध्यक्ष पद मिळाला असून ही संधी तालुक्याला दुसऱ्यांदा मिळाली आहे, राष्ट्रवादी चे आमदार राजकुमार बडोले यांच्या अत्यंत जवळचे वेक्ती म्हणून ओळखले जाणारे लायकराम भेंडारकर आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोन्डगावदेवी जिल्हापरिषद क्षेत्रातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते.
त्यांनी आपल्या भागातील विकास कामावर भर दिली, प्राप्त माहिती नुसार तब्बल सतरा वर्षे पूर्वी या जिल्हा परिषद क्षेत्रातून जिल्हा परिषद गोंदिया चे अध्यक्ष म्हणून काँग्रेश पक्षाचे चंद्रशेखर ठवरे यांनी जानेवारी 2008 मधे अध्यक्ष पद सांभाळले होते, सध्या स्थितीत गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही, तर जिल्ह्यात नुकतेच संपन्न झालेले पंचायत समिती सभापती पद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं वरचढ ठरली आहे.
