परीक्षेत यश मिळवायचे असेल तर वेळेचे नियोजन करून अभ्यास करा : प्राचार्या उमा बाच्छल

  • लोहिया विद्यालयात कॉपीमुक्त अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

सौंदड, दि. 25 जानेवारी : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्य. विद्यालय सौंदड येथे दि. 24 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला संस्थापक संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या उमा बाच्छल, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्णे, प्राध्यापक आर .एन. अग्रवाल, जी . एस. कावळे, डी.ए. दरवडे, स. शि. के.एस. काळे आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले की परीक्षेत यश मिळवायचे असेल तर वेळेचे नियोजन करून अभ्यास करावे व भरघोष यश संपादन करावे, तसेच प्रमुख अतिथी डी. एस. टेंभुर्णे, डी. ए. दरवडे यांनी भयमुक्त वातावरणात शांतचित्ताने कॉपीमुक्त परीक्षा द्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी वर्ग १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाला १० वी १२ ला शिकविणारे शिक्षक तसेच १० वी व १२ वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Comment

और पढ़ें