- सौंदड परिसरात मुरूम, गिट्टी ( चोर ) माफियांचा सुळसुळाट, गेली वर्ष भऱ्या पासून तांडव सुरु, महसूल विभाग मात्र सुस्त!
सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दिनांक : 24 जानेवारी 2025 : तालुक्यातील ग्राम सौंदड येथे असलेल्या उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षे भरापासून बंद आहे, तर आता नुकतेच या उड्डाणं पुलाच्या निर्मितीचे काम पुन्हा सुरू झाले आहे, अशात काम करणाऱ्या कंपनीने सदर ठिकाणी मटेरियल आणून ठेवले होते, हे मटेरियल सौन्दड येथील काही मुरूम, गिट्टी माफियानी रात्रीला, जेसीबीच्या सह्याने तीन ट्रॅक्टर मधे गिट्टी भरून चोरी केली आहे या बाबद चा एक विडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
चोरी बाबद कंपनीच्या अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती नव्हती, पाहणी केली असता गिट्टी चोरी झाल्याचे लक्ष्यात आले, गिट्टी चोरी बाबद तक्रार देणार अशी माहिती कंपनीचे साईड इन्चार्ज कुणाल भारसगडे यांनी महाराष्ट्र केसरी न्युज सोबत बोलताना दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते विशाल उजवणे यांनी महाराष्ट्र केसरी न्युज सोबत बोलताना सांगितलं की सदर व्हिडिओ रात्रीला मीच काढला आहे, मला वाटले रात्रीला कंपनीचे काम सुरू आहे, मि माहिती काढली असता याबाबत कंपनीला कुठलीही माहिती नाही, गीट्टी व मुरूम चोरीचे सत्र सौंदड भागामध्ये नियमित सुरू असते, याकडे लक्ष देण्यासाठी स्थानिक महसूल विभागाला वेळ नाही, स्थानिक तलाठी व उपविभागीय अधिकारी यांना देखील या भागात होत असलेल्या चोरींची माहिती मि दिली आहे, मात्र त्यांनी अद्यापही कुठली कारवाई केली नाही.
- विशाल उजवणे, सामाजिक कार्यकर्ता सौन्दड –
मि पिलकॉन कंपनीचे साईड इंजिनियर कुणाल भारसगडे यांना भ्रमण ध्वनी वरून माहिती विचारली कि, सौन्दड येथील उड्डाणं पुलाच्या सुरवातीला असलेले जीएसबी गिट्टी मटेरियर रात्रीला कुठे नेले त्यावर ते म्हणाले या बाबद मला काही माहिती नाही, गिट्टी चोरी झाली आहे, मी पोलिसात जाऊन तक्रार देतो.
- कुणाल भारसगडे, साईड इंजिनियर, पिलकॉन कंपनी उड्डाणं पूल सौन्दड
सौंदड येथील उड्डाण पुलाचे काम पीलकॉन कंपनीला मिळाले असून एक ते दीड महिना झाला आहे, तसेच आता कामाला सुरवात झाली आहे, साइटवर असलेला संपूर्ण मटेरियल हा आमच्या कंपनीचा आहे, सध्या इथे सेक्युरिटी नाही, चोरी झालेल्या गिट्टीची मी तक्रार पोलीस स्टेशन डुग्गीपार इथे केली आहे, पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले आहे.
- मंगेश काळे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन डूगगीपार
सौंदड येथील उड्डाण पुलावरून गिट्टी चोरी गेल्या प्रकरणी तक्रार देण्यासाठी काही लोक आली होती, सदर तक्रारीत काही मुद्दे निश्चित नसल्यामुळे त्याची शहानिशा करून तक्रार दाखल केली जाईल.
- उड्डाणपूल वर्षे भर पासून बंद, आंदोलन करून काय उपयोग?
नागपूर ते रायपूर या मुख्य शहरांना जोडणारे राष्ट्रीय महामार्ग : 53 हे गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातुन जाते, तसेच ते सौंदड या गावातूनही जाते, ग्राम सौंदड येथून चंद्रपूर ते गोंदिया हे रेल्वे मार्ग जात असल्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती चे काम गेली चार ते पाच वर्षे पासून मंद गतीने सुरु होते, तर सर्व्हिस रोड संपूर्ण फुटलेल्या अवस्थेत होते, या ठिकाणी अनेक अपघात झाले असून दहा दहा तास ट्राफिक जाम राहायची त्या मुळे गावकरी व प्रवाशी कंटाळले होते.
कामात दिरंगाई केल्यामुळे NHAI कडून सदर कंपनीला ब्लॅक लिस्टेड करण्यात आलं अशी माहिती होती, थांबलेले उड्डाणं पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी, भारतीय जनता पार्टीचे स्थानिक सरपंच हर्ष मोदी यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन भीक मांगो आंदोलन करून सदर कंपनीला मिळालेले पैसे दिले, त्यानंतर गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, दरम्यान यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते, भंडारा, गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे, तसेच नागपूर येथील आमदार अभिजित वंजारी ही उपस्थित होते.
रस्त्याचे व उड्डाण पुलाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करून नागरिकांसाठी उड्डाणं पूल सुरू करण्यात यावे अशी मागणी घेऊन यावेळी आंदोलन करण्यात आले होते, आंदोलन वेळी NHAI चे अधिकारी देखील येथे उपस्थित होते, तातकाळ काम सुरु करू असे त्यांनी आस्वसन दिले होते, जवळपास सहा महिन्याच्या वर कालावधी लोटला तरी हे उड्डाणं पूल अजून सुरु झाले नाही, त्यामुळे आंदोलन करून काय फायदा असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
