सौन्दड, दी. 24 जानेवारी : स्थानिक पॅराडाईस किड्स केअर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन दि. 21 जानेवारी रोजी करण्यात आले. सहली अंतर्गत खएकून 75 विद्यार्थी व 15 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे आंतर्यष्ट्रीय प्राणी संग्रहालय, नागपूर येथे भेट देऊन वन्य प्राण्यांचे अगदी काही फुटाच्या अंतरावरून दर्शन घेतले, अश्या प्रकारचा अनुभव विद्यार्ध्यांनी पहिल्यांदाच घेतला.
- विद्यार्थ्यांनी घेतला मेट्रो ट्रेन चा आनंद
प्राणी संग्रहालयाच्या भेटीनंतर चिमुकल्यांनी मेट्रो ट्रेनच्या प्रवासाचा अनुभव प्रत्यक्ष घेतला, या विषयी शाळेच्या विनंतीवरुन “मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य करून मुलांची सुरक्षित चढ-उतार होईपर्यत ट्रेनला जास्त वेळ स्टेशनवर थांबविली. मेट्रौ बाबतची मुलांमध्ये असलेली उत्सुकता व त्यांचा उत्साह व आनंद बघण्या सारखा होता.
विद्यार्थ्याच्या जीवनात विज्ञानाचे असाधारण महत्व असते, हि बाब डोळ्यांसमोर ठेऊन, शाळेने विद्यार्थ्यांना नागपूर येधील शैक्षणिक दृष्टिकोनातून अतिशय महत्व असलेले ‘रमण विज्ञान’ केंद्रात नेले येथे मुलांनी तारामंडल प्रत्यक्ष अनुभवला तसेच त्रि आयामी माहितीपटाचा पहील्यांदाच आस्वाद घेतला.
सहलीच्या शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या विनंतीवरुन त्यांना कामठी येथील बौद्ध धर्मियांचे श्रद्धा स्थान असलेल्या ड्रॅगन पॅलेसचे दर्शन घडविण्यात आले, येथे त्यांना सदर इमारती बद्दल माहिती देण्यात आली, या सहलीत मुख्यध्यापिका राजेश्री राऊत, संचालक संतोष राऊत, शाळा प्रशासन अधिकारी मुजम्मील सैयद, शिक्षक अस्व्जीत राऊत, दर्शना डोंगरवार , प्राची श्रीवास्तव, मीना रामटेके, मनीषा राऊत, उषा बिसेन, ज्योती नेवारे, योगिता इरले, प्रणाली कापगते, योगी मस्के, उमेश कवरे, लोकेश राऊत, युब्या हाडगे, कल्पना खेकरे, प्रगती डोंगरे यांनी विद्दार्ध्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली.
