गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे २८६ कोटी रुपयांचे चुकारे थकले 

  • २३ लाख किविंटल धानाची खरेदी, ७४ हजार ३८ शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री.

गोंदिया, दी. २३ जानेवारी  : गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या ५० हजारांवर शेतकऱ्यांचे २८६ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या दोन महिन्यांपासून थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मार्केटिंग फेडरेशनने सुद्धा थकीत चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हमीभाव केंद्रावरून धान खरेदी करते. फेडरेशनच्या १८३ धान खरेदी केंद्रावरून नोंदणी केलेल्या १ लाख ५० हजार २३४ शेतकऱ्यांपैकी ७४ हजार ३८ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे.

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत ५३२ कोटी ५९ लाख रुपये असून यापैकी २८६ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. तर २८६ कोटी रुपयांचे चुकारे शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने रखडले आहेत. दोन महिन्यांपासून चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें