जिल्हा स्तरीय पलाश मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन बचत गटांनी लावली शेकडो दुकाने

गोंदिया, दि. 23 जानेवारी  : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत गोंदियात या वर्षी २२ ते २६ जानेवारी दरम्यान ५ दिवशीय जिल्हा स्थरीय पलाश मिनी सरस प्रदर्शनीचे आयोजन गोंदिया शहरातील भारतीय स्टेट बँके समोर असलेल्या सुभाष ग्राउंड मध्ये दि. 22 जानेवारी रोजी करण्यात आले असून या प्रदर्शनीचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनीत उमेद अंतर्गत येत असेल्या गोंदिया जिल्यातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री तसेच प्रदर्शनी भरविण्यात आली आहे, सोबतच विदर्भातील ताजे तवाणे तडाकेदार खाद्यपदार्थ, विदर्भातील तरी पोहा, चना पोहा, पातोळी, गावरान कोंबळी चे तडकेदार चिकन, मटण, पुरण पोळी, लोणचे, पापड, कुरवड्या, आदी खाद्या सामुग्रीची विक्री या ठिकाणी करण्यात येत आहे तर बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले दागिने शोभेच्या वस्तू हस्त्य कौशल्याने तयार केलेले कपडे याची देखील विक्री या प्रदर्शनीत करण्यात येत आहे तर बच्चे कंपनी करिता देखील मुलांना खेळण्या साठी बाल मंच या ठिकाणी तयार करण्यात आला आहे.

तर या पाच दिवशीय प्रदर्शनी बचत गटाच्या महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध लोक कला, हास्य प्रदर्शन, संगीत मैफिल, नाटक आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू आणि खाद्य उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनीत एकदा तरी भेट देत प्रदर्शनीचा लाभ घ्या असे आव्हाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोननती अभियाच्या वतीने करण्यात आले आहे, दरम्यान सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष यांनी भेट दिली.

Leave a Comment

और पढ़ें