नाना पटोले यांनी मला कधीही साथ दिली नाही, असे म्हणत नीलम गेला अनेक कार्यकर्त्यांसह भाजप मधे

गोंदिया, दि. 19 जानेवारी : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्तीय समजले जाणारे छावा संग्राम परिषदेचे जिल्हा अध्यक्ष नीलम हलमारे यांनी नाना पाटोले यांच्या कडून होणाऱ्या अपमानाला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडत गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात आज दि. 19 जानेवारी रोजी  प्रवेश केला आहे.

नाना पटोले यांनी मला जिल्हा परिषद निवडणुकीत पंजा निवडूक चिन्ह देत निवडणूक लढण्याची संधी दिली मात्र माझ्या प्रच्राराला न येता मला एकटे सोडले ज्या पक्षात गेली 20 वर्ष मी निष्ठेने काम केली तर नाना पटोले यांची छावा संग्राम परिषद वाढविण्यास मदत केली तरी देखील नाना पटोले यांनी मला कधीही साथ दिली नाही, त्यांना सामान्य कार्यकर्त्यांशी काही घेणे देणे नाही, त्यामुळे मी नाना पटोले याना न सांगता कॉग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे नीलम हलमारे यांनी सांगितले आहे.

तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील नाना पटोले हे प्रदेश अध्यक्ष असताना त्यांना महाराष्ट्र राज्यात सरकार देखील आणता आले नाही,  त्यामुळे हुकूमशाही चालत असलेल्या पक्षात आणखी अपमानित होऊन किती दिवस काम करायचे त्यामुळे विकासाच्या दिशेने पाऊल वाट वाढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाची साथ नीलम हलमारे यांनी निवढली असून येत्या काळात काँग्रेस पक्षाला आणखी गडती लागेल असे भाकीत त्यांनी केले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें