पुतळी येथील शेतकऱ्यांनी शेती अभ्यास दौऱ्याकरिता केला थेट विमान प्रवास

सडक अर्जुनी, दि. 19 जानेवारी : युवा मराठा शेतकरी गटामार्फत दि. 6 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान 24 शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या अभ्यास दौऱ्याचे संपूर्ण नियोजन कृषी सहाय्यक राजशेखर राणे यांनी करून दिले. या अभ्यास दौऱ्यादरम्यान कोकण कृषि विद्यापीठ, नाशिक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, आधुनिक शेती तंत्रज्ञान फळबाग, तसेच प्रक्रिया उद्योग यांचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन युवा मराठा शेतकरी गटा मार्फत करण्यात आले होते.

गोंदिया पासून राज्याच्या शेवटच्या टोकावर जाण्यासाठी अंतर खूप जास्त असल्याने कमी वेळात अभ्यास दौरा पूर्ण करण्यासाठी राजशेखर राणे कृषि सहाय्यक यांनी शेतकऱ्यांपुढे विवान प्रवास केल्यास वेळेची बचत होईल असा प्रस्ताव ठेवला, गट प्रमुखांनी विमान प्रवास करण्याचा मार्ग निवडला व गटातील सर्व 24 सदस्यांनी त्या निर्णयाला होकार दर्शवला व गोंदिया ते गोवा विमान प्रवासाचे तिकीट आरक्षित करून घेतले.

गटा मार्फत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांच्याकडे अभ्यास दौऱ्यादरम्यान कृषि विभागा मार्फत एक कृषी सहाय्यक मार्गदर्शक म्हणून मिळणे बाबत गट प्रमुखांनी विनंती केली, त्यावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी तात्काळ राजशेखर राणे सडक अर्जुनी यांना शेतकरी गटासह अभ्यास दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला व तसे आदेश संबंधित कृषि सहायकांच्या तालुका कृषी अधिकारी यांना दिले.

तालुका कृषि अधिकारी कु. लीलाधर पाठक, कृषि पर्यवेक्षक खुशाल ब्राम्हणकर, कृषी पर्यवेक्षक रजनीश पंचभाई, गुलचंद्र मस्के, कृषी सहाय्यक अंबुले, ठवरे यांनी सहल प्रवास सुरू करण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांना दौरा यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन केले व सहलीस हिरवी झेंडी दाखउन प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.

दिनांक 6 ते 13 जानेवारी 2024 रोज दरम्यान शेतकऱ्यांनी अभ्यास दौरा पूर्ण केला. या अभ्यास दौऱ्यात बाळसाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ नाशिक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी आधुनिक शेती तंत्रज्ञान फळबाग, तसेच प्रक्रिया उद्योग यांचा अभ्यास पूर्ण केला, शुभम मेश्राम, रवींद्र कापगते, महेश मुगमोडे, उल्हास कापगते, दिगंबर कापगते, रणजीत पर्वते, भोजराज कापगते, नेपाळ डोंगरवार, पद्माकर काशिवार, राजेश आरसुळे, दिलीप कापगते, शांतीलाल कापगते, विनोद डोंगरवार, राजेंद्र राऊत, संजय कापगते, अमोल कापगते, निलेश करसकार, वेदांत आपुतीकर, अजय इंगोले, ईशान खेडकर सर्व युवा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

  • राजेश आर्सोडे, युवा मराठा शेतकरी गट प्रमुख

दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण शेतकरी सहलीचे आयोजन करण्यात आले. परंतु ह्या वर्षीची सहल जीवनातील एक आठवन असणारी अशी आगळी वेगळी सहल होती, म्हणजे शेतकऱ्यांचे प्रवास हा विमान, समुद्री जहाज मेट्रो ट्रेन ने, बस, कार, अश्या वेवगळ्या माध्यमातून पूर्ण झाला, आयोजक, राजशेखर राणे कृषि सहाय्यक यांनी कृषि विकासा मध्ये भर यावा या साठी हा अभ्यास दौरा आयोजित केला होता, राज्यामध्ये कृषि क्षेत्रात झालेला बदल, कृषि तंत्रज्ञानाबाबत झालेली प्रगती, निरनिराळ्या पीक लागवड पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी संशोधन केंद्रे, तसेच कृषि विद्यापीठे भेटी व प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रास प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन माहिती देण्यात आली, तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतात, त्यासाठी या शेतकरी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी सहलीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी प्रवेश करून या शेतकरी अभ्यास दौऱ्या चा लाभ घेतला.

Leave a Comment

और पढ़ें