डव्वा, सटवा गावातील मुख्य मार्गाच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

  • तक्रारदार यांना ब्लॅकमेल करीत ॲट्रॉसिटी चा खोटा बनाव 
  • कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे आर्थिक लागेबांधे, गावकऱ्यांचा आरोप.

गोरेगाव/गोंदिया, दि. 19 जानेवारी : गोरेगाव तालुक्यातील मौजा डव्वा, सटवा गावातील सिंधी चौक ते जगदीश बोपचे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम ऑगस्ट 2024 च्या शेवटी सुरू करण्यात आले. सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याबाबतची माहिती कनिष्ठ अभियंता महेंद्र खोब्रागडे यांना तक्रारदार यांनी वारंवार माहिती दिली, परंतु तक्रारींकडे दुर्लक्ष करीत काम चागले होत असल्याचे सांगून गावकऱ्यांची दिशाभूल केली असा आरोप आहे. तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संजय बघेले यांनी दिनांक 08, 10, 2024 रोजी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया येथे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सदर सिमेंट रस्त्याचे बांधकामाची माहिती मागविली, माहिती प्राप्त न झाल्याने दिनांक 28, 11, 2024 रोजी कार्यकारी अभियंता सार्व. बांध. विभाग जि.प. यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली.

त्यावर कार्यकारी अभियंता यांनी दिनांक 05, 12, 2024 रोजी प्रथम अपील सुनावणीचे आयोजन केले, तसेच त्यावर प्रथम अपीलीय अधिकारी यांनी जन माहिती अधिकारी तथा उप कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग जि.प. गोंदिया यांना माहिती विनामूल्य देण्याचे आदेशित केले, तरीसुद्धा संबंधितांनी हेतू परस्पर जाणीवपूर्वक सुळ बुद्धीच्या भावनेने आज पावेतो अर्जदार यांना माहिती पुरविली नाही. सदर गावातील सिमेंट रस्ता बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्या कामाचे देयके थांबवण्या बाबतची तक्रार गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय डव्वा येथे दिनांक 17, 12, 2024 रोजी दिली आहे.

तसेच गावकऱ्यांची दुसरी तक्रार मौजा डव्वा (सटवा) येथे 5054019/31 जिल्हा वार्षिक योजनेतून बनवण्यात आलेले सिमेंट रस्ता कंत्राटदाराचे नाव काळे यादीत टाकून कामाचे देयके अदा न करण्याबाबतची तक्रार दिनांक 21, 12, 2024 रोजी केली असून जिल्हाधिकारी गोंदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जि.प. गोंदिया तसेच अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूर यांना योग्य कार्यवाहीस्तव सादर केलेली आहे. तक्रारदार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की सदर कामाचे कंत्राटदार हे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे आहेत, अशी माहिती संबंधित कनिष्ठ अभियंता यांनी दिल्याचे ही ते म्हणाले.

सदर प्रकरणात ग्राम पंचायत कार्यालय डव्वा तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद येथे तक्रार दिल्या मुळे चिडून जाऊन, जि.प. सदस्य याने दुसऱ्या वेक्तीला समोर करून सामाजिक कार्यकर्ते संजय बघेले यांनी जातीवाचक शिविगाळ दिली व पैशाची मागणी केली अशी खोटी, लेखी तक्रार पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथे दिली आहे. एकंदरीत तक्रारदाराला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सदर बांधकाम निकृष्ट होत असल्याचे, वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला असून सुद्धा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम व कनिष्ठ अभियंता महेंद्र खोब्रागडे हे आपले आर्थिक फायद्यापोटी, लागेबांधे, संबंधित कंत्राटदाराशी करीत असलेल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाला सह देत आहेत. असा ही आरोप तक्रारदार यांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक. संकीर्ण 2017/प्र.क्र..9/नियोजन – 3, दिनांक 27, 04, 2017 नुसार काँक्रीट त्याचे बांधकाम 30 वर्षापर्यंत टिकणे अपेक्षित असताना सुद्धा सदर रस्त्याचे बांधकाम हे अवघ्या 2 महिन्यातच उखडणे सुरू झाले आहे, करिता त्यावर काही भागात संबंधित कंत्राटदाराने लिपापोती केली आहे, करिता अशा वेजबाबदार कंत्राटदाराचे नाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासन निर्णय क्रमांक. संकीर्ण- 2020/प्र. क्र. 147/इमा -2, दिनांक 30 जुलै, 2020 मध्ये नमूद केले प्रमाणे काळे यादीत टाकण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. सदर प्रकरणात झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे देयके अदा केल्यास कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता हे यास जबाबदार धरून सदर रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी ही मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय बघेले, गावकरी कामेश्र्वर क्षीरसागर, उमेश कटरे, धनेश बोपचे, रामभाऊ क्षिरसागर, देबिलाल बोपचे, हेमराज कोल्हे, उज्वल बघेले, मेघश्याम येडे, राधेश्याम जी कोल्हे, छोटे बघेले सह अनेक गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें