वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रक सह, 27 लाख 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. 

  • अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांचे दणानले धाबे.

अर्जुनी मोरगाव, दि. 18 जानेवारी : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथील चुलबंद नदीच्या घाटातील रेतीचा उपसा करून रेतीची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अर्जुनी मोरगाव महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी दि.18 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता नवेगावबांध येथे पकडले आहे. 

या प्रकरणी 27 लाख 9 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ट्रक क्रमांक एम.एच. 35 ए.जे. 4239 असे असून वाहनाची किंमत 27 लाख रुपये तसेच 2 ब्रास वाळू ची किंमत 9 हजार रुपये असा एकूण 27 लाख 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ट्रक मालक नामे शुभम विलास नागदेवे व ट्रक चालक राहुल सुकाली भोयर रा. कनेरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया यांच्यावर जमीन महसूल अधिनियम अंतर्गत दंडात्मक कारवाई करुन जप्त केलेल्या ट्रकला तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे जमा करण्यात आले.

तर अर्जुनी मोरगाव महसूल विभागाने केलेल्या कारवाई मुळे तालुक्यातील अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत. सदरची कारवाई अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शाहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनात नवेगावबांध चे मंडळ अधिकारी उमराव वाघधरे व महसूल सेवक एस.के. सांगोळकर यांनी केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें