पोलीस स्टेशन डूग्गीपार ; खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना 5 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड

गोंदिया, दि. 18 जानेवारी : शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत मीटिंग मधल्या भांडणा वरून मनात राग धरून जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कुऱ्हाडीने काठीने हातावर, मांडीवर मारून जखमी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून पोलीस ठाणे डुग्गीपार येथे खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा घटना दिनांक 27/06/2017 रोजी 08.00 वाजता सुमारास मौजा- हेटी- गिरोला येथे घडला असून यातील आरोपी नामे 1) सुरेश सदाशिव लांजेवार वय 58 वर्षे, 2) माणिक सुरेश लांजेवार व 24 वर्षे, दोन्ही राहणार हेटी-गिरोला, तालुका सडक/अर्जुनी, जिल्हा- गोंदिया यांनी फिर्यादी चा भाऊ तुकाराम हगरू लांजेवार वय 65 वर्षे यांना मारहाण केल्या प्रकरणी अपराध क्रमांक- 60/2017 कलम 307, 34 भा. दं. वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता, सदर गुन्ह्या न्यायालयीन खटला केस क्रं. 90/2017 प्रमाणे न्याय निवाडयाकरीता प्रकरण न्यायालयात सुरू होते.

मा. न्यायालयात सदर खटल्याचे सुनावणीत पंच, साक्षीदारांचे बयान, सबळ साक्षीपुरावे, युक्तिवादानंतर दिनांक- 17 जानेवारी 2025 रोजी सदर प्रकरणाचा न्यायनिवाडा करत माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे, यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे 1) सुरेश सदाशिव लांजेवार वय 58 वर्षे आणि 2) माणिक सुरेश लांजेवार व 24 वर्षे दोन्ही राहणार हेटी- गिरोला, तालुका सडक/ अर्जुनी, जिल्हा गोंदिया यांना 5 वर्षाची शिक्षा व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर शिक्षा झालेल्या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. विजय सांडभोर, पोलीस ठाणे डुगीपार यांनी उत्तमरीत्या केलेला असून माननीय न्यायालयात सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता पारधी यांनी बाजु मांडली, तर न्यायालयात पैरवीचे कामकाज पो.हवा सुनील मेश्राम यांनी पाहिले.

 

Leave a Comment

और पढ़ें