आपकारिटोला शाळेचा अभिनव उपक्रम, परसबागेतील भाजीविक्री करून विद्यार्थ्यांना दिले व्यवहाराचे धडे

सडक अर्जुनी, दि. 03 जानेवारी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपकारीटोला शेंडा केंद्रातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील सुंदर व सुसज्ज असलेली प्राथमिक शाळा आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. सडक अर्जुनी तालुक्यात परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेली शाळा आहे.

विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या सहकार्याने शाळेमध्ये सुंदर परसबाग फुलवलेली आहे. परत बागेमध्ये विविध प्रकारच्या फळभाज्या व फुलेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. परसबागेतील पालेभाज्या व फळभाज्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शालेय पोषण आहारात सुद्धा केला जातो. एक ते चार वर्ग असलेल्या लहानशा शाळेतील विद्यार्थी परसबागेची काळजी करून पालक व शिक्षकांच्या सहकार्याने शेती विषयक ज्ञान अर्जित करतात.

यातच शालेय पोषण आहारामध्ये पालेभाज्या व फळभाज्याच्या उपयोगाच्या व्यतिरिक्त उरलेली पालेभाजी भाजीपाला व्यापारी योगेश्वर राऊत यांना विक्री करून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान दिले जाते.
यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र जी मडावी, उपाध्यक्ष शोभाताई टेकाम, रेखा उईके, मदतनीस सीमा मडावी, विशेष कार्य केल्याबद्दल पोषण आहार मदतनिश सौ. हिराबाई उईके, शाळेचे सहाय्यक शिक्षक ललित फुंडे सर, शालेय मंत्रिमंडळाचे शाळेचे मुख्याध्यापक किशोर बावनकर यांनी कौतुक केले.

Leave a Comment

और पढ़ें