आ. बडोले यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अनेक विषयांवर सदनाचे लक्ष वेधले.

अर्जुनी मोर. दी. 22 डिसेंबर : नागपुर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार ईंजी. राजकुमार बडोले यांनी विदर्भासह गोंदिया जिल्ह्यातील तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विवीध विषय मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.

या विषयामधे मुंबई येथील इंदू मिल स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, सोबतच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांचा विकास तसेच विविध महापुरुषांच्या स्मारकाचा विकास करणे आणि सुरु असलेली कामे पूर्ण करणे,
विविध समाजाचे महामंडळांना जास्तीस जास्त निधी देणे, गोंदिया भंडारा जिल्ह्याला वरदान ठरलेल्या धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता झाली असून निधी उपलब्द करुन देण्यात यावा.

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात झाशीनगर उपसा सिंचन योजना मुळे ३५०० हेक्टर शेतजमिनीला लाभ होणार असून सदर प्रकल्पाच्या अडचणी दूर करून लवकरात लवकर प्रकल्प सुरू करून कार्यान्वित करणे, गोंदिया जिल्ह्यातील मच्छीमारांची समस्या सोडविणे, गोंदिया जिल्हा मधील झाडीपट्टी मधे नाट्यगृह निर्माण करणे, गोंदिया जिल्ह्यातील काही गावांमधील बंद असलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना परत सुरु करणे, धान खरेदी प्रक्रिया सुरळीत व्हाव्ही म्हणून बारदाना उपलब्ध करुन देणे आणि धानाला २५ हजार रुपये बोनस देण्यात यावा तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवाना ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्यात यावी ही मागणी विधानसभेत केली.

Leave a Comment

और पढ़ें