सावधान! वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर कारवाईचा दणका सुरू 

  • वाहतूक विभागाला मिळणार इंटरसेप्टर वाहन

गोंदिया, दी. 19 डिसेंबर : डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात आणि या अपघातावर आळा घालण्यासाठी आता वाहतूक विभाग सज्ज झाला असून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. तर पोलिसांकडून वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. बेसावधपणे वाहन चालवणाऱ्या वाहानावर तसेच अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या व वीणा हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली असून आता पर्यंत 334 वाहनावर कारवाई करण्यात आली आहे.

तर 5 वाहणे सुद्धा जप्त करण्यात आली आहेत, आता गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाला इंटरसेप्टर वाहन प्राप्त होणार असून लवकरच वाहतूक विभागालाही वाहन मिळणार आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये अति वेगाने वाहन चालवणे, मोबाईलवर बोलणे, दुचाकी वर हेल्मेटचा वापर न करणे अशा विविध प्रकारच्या वाहनांवर आळा घालण्यासाठी आता हे वाहन महत्त्वाचं ठरणार असल्याचे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भाषकर यांनी सांगितले आहे. हे वाहन संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरनार असून वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment

और पढ़ें