जयपाल गहाणे यांचे निधन आज होणार अंतिम संस्कार

सडक अर्जुनी, दी. 14 डिसेंबर : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील रहिवाशी जयपाल बळीरामजी गहाणे वय वर्षे 54 यांचे दी. 13 डिसेंबर च्या रात्री 12 : 30 वाजता सौंदड येथील घरी मृत्यू झाले. त्यांच्या पच्यात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा आप्त परिवार आहे. रात्री नागपूर येथील आयुष्मान हॉस्पिटल येथून सौंदड येथे आणल्या नंतर त्यांचे निधन झाले.

दी. 06 डिसेंबर रोजी बोपाबोडी वरून सौंदड कडे येत असताना मार्गावर दुचाकी वाहनाचे अपघात झाल्याने त्यात ते गंभीर जख्मी झाले, अश्यात त्यांना उपचारासाठी सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर गंभीर जख्मी असल्याने डॉक्टरांनी त्यांना भंडारा येथील खाजगी रुग्णालयात रेफर केले.

तिथे ही उपचार न झाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांनी 13 डिसेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज केल दरम्यान त्याच रात्रीला घरी आल्यानंतर त्यांचे मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या परिवाराकडून देण्यात आली आहे, आज 11 वाजता दरम्यान फुटाळा येथील चुलबंद नदीच्या गवळी पुल येथील घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें