“गोंदिया ची वाळू अवैध मार्गाने नागपूर ला” 6 ट्रक वर जप्तीची कारवाई!

गोंदिया, दी. 08 डिसेंबर : गोंदिया येथील वाळू नागपूरला अवैध मार्गाने घेऊन जाणाऱ्या 6 ट्रक वर तहसीलदार समसेर पठाण यांनी धाड टाकत जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई 06 डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. प्राप्त माहिती नुसार गोंदिया येथील तहसीलदार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे भरारी पथकाने रात्रीच्या सुमारास ठीक ठिकाणी गस्त घातली असता गोंदिया मेडिकल कॉलेज च्या नवीन इमारतीचे काम सुरु असलेल्या ठिकाणी हे 06 ट्रक जप्त करण्यात आले आहेत, तर हे सर्व ट्रक नागपूर पासिंग असल्याने ही वाळू ट्रकच्या साह्याने नागपूरला घेऊन जात असावी अशी शंका वेक्त केली जात आहे.

गोंदिया जिल्यातील विविध वाळू घाटावरुन मागील अनेक दिवसा पासून वाळू चा अवैध उपसा सुरु आहे, मात्र 06 डिसेंबर रोजी एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रक एकाच दिवशी पडकल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले जात आहे, तर दुसरीकडे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार का ? की राजकीय दबावातून सोडून देण्यात येणार अशी शंका वेक्त केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें