सडक अर्जुनी, दी. 08 डिसेंबर : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील आदिवासी गोवारी समाज संघटन यांच्या वतीने 114 आदिवासी शहीद स्मारक येथे दि. 06 डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन बाबासाहेब यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच कुंदाताई साखरे, रंजनाताई भोई सदस्या, शुभम जनबंधू सदस्य, खुशाल ब्राह्मणकर सदस्य, प्रमिलाताई निर्वाण सदस्या, चरणदास शाहारे माजी तंटा अध्यक्ष, मदन साखरे सामाजिक कार्यकर्ता, सुभाष टेंभूर्णे सामाजिक कार्यकर्ता, आशिष राऊत सामाजिक कार्यकर्ता, धम्मदीप टेंभूर्णे सामाजिक कार्यकर्ता तसेच आदिवासी गोवारी समाज संघटनेचे सल्लागार शंकर खेकरे, संघटक सुरेश खेकरे, देवानंद वाघडे, सुनील सोनवाने, कुंदन राऊत, लालचंद खेकरे, पुरुषोत्तम खेकरे, मंगेश खेकरे, देवचंद भोंडे सह गावकरी मंडळी उपस्थितीत होते.