सौंदड, दी. 08 डिसेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 6 डिसेंबर 2024 रोज शुक्रवारला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिन’ विद्यालयात संस्थापक- संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने संस्था उपाध्यक्ष आ.न. घाटबांधे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.न .घाटबांधे प्रमुख अतिथि लोहिया शिक्षण संस्थेचे सचिव पंकज लोहिया यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. त्यानंतर विद्यालयासमोरील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला संस्था सचिव पंकज लोहिया यांनी माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र अंगीकृत करुन आपले जीवन सार्थक करावे.” असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्राचार्य उमा बाच्छल, गुलाबचंद चिखलोंडे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्ण, प्राध्यापक आर. एन.अग्रवाल, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्राध्यापिका पी.एस. भेंडारकर , स. शिक्षिका डी. व्ही. उजवने यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील लोकांच्या शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थांना सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी सुद्धा आपल्या भाषणातून व गीताद्वारे त्यांच्या जीवन कार्याचा गुणगौरव केला.
कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन यू. बी. डोये यांनी केले तर आभार स. शिक्षक टी. बी. सातकर यांनी मानले.