- तालुका महसूल विभागाचे सर्रास दुर्लक्ष!
सडक अर्जुनी, दी. 07 डिसेंबर : तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदी पात्रातून दिवसा ढवळ्या रेती चे उत्खनन सुरू आहे, यात पळसगाव आणि पीपरी या दोन नदी पत्रातून रेतीचा ( वाळूचा ) उपसा सध्या सुरू असल्याची खात्री लायक माहिती सूत्रांनी दिली आहे, या अवैध रेती उत्खनन मुळे महसूल विभागाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे, असे असले तरी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीच्या काळात महसूल विभाग वेस्त होता मात्र आता ही कारवाई करायला वेळ नाही का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे संपूर्ण नदी पात्र पोखरले गेले आहे. आणि या भागातील रेती नवेगाव बांध, अर्जुनी मोरगाव, देवरी येथे अधिक दराने विक्री करीता पाठवली जात आहे.
रोज होत असलेल्या वाळू उपसा मुळे नदी पात्रातील पाण्याचे सिंचन नाहीसे होत आहे. नदी पात्रात असलेल्या रेती मुळे जमिनीतील पाण्याची पातळी टिकून राहते, मात्र रोज होत असलेल्या वाळू उपसा मुळे नदी पात्र खोल होत आहेत, आणि त्या मुळेच नदी पात्रातील पाण्याचा ओलावा कमी होत आहे, उन्हाळा लागताच नदी व नाले कोरडे पडतात, आणि या मुळेच पिण्याचे व शेती उपयोगी पाण्याची कमतरता भासते.
नदी पात्रातील वाळू चोरी जाऊ नये या साठी स्थानिक यंत्रणा कुठलीही उपाय योजना करताना दिसत नाही, 112 हा पोलिस विभागाचा इमर्जन्सी नंबर असला तरी घटनास्थळी पोलीस येण्या अगोदर अवैध उत्खनन करणाऱ्या टोळ्या पसार होतात, हा प्रकार पोलिस विभाग सोबतच होतो असा नाही तर महसूल विभाच्या अधिकाऱ्यांना देखील अवैध उत्खननाची माहिती दिल्यास चोरांना याची माहिती मिळते की त्या वेक्तिने तक्रार केली आहे.
तालुक्यातील भ्रष्ट यंत्रणा, हप्ते खोलीच्या आडीत आपले खिसे भरण्याच्या कामात व्यस्त असल्याने तालुक्यातून अवैध रित्या गौण खनिज मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीने तक्रार कुठे करावी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे, सातत्याने होत असलेल्या अवैध रेती उपशावर आता तरी महसूल विभाग कारवाई करणार का ? व फिरते पथक सुरू करणार का ? याकडे संपूर्ण तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)