सडक अर्जुनी, दी. 07 डिसेंबर : तालुक्यातील ग्राम सावंगी येथील प्रतेक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन डॉक्टर जनावरांची ( पशुधनाची ) पशुगणना करीत असल्याची माहिती डॉक्टर अमोल डेकाटे यांनी दिली आहे. यामध्ये पशुपालक यांचेकडे असलेल्या संपूर्ण पशुधणास टेगिंग करून त्यांची नोंद प्रथम एन.डी.एल.एम. या केंद्र सरकारच्या ॲप मध्ये केल्या नंतरच पशु गणनेत नोंद घेण्यात येते, तसेच आपण बाहेरील खरेदी केलेले जनावर असेल व त्यास जुना टॅग लागला असेल तर तो टॅग पशुपालक यांचे नावावर करण्यात येईल तसेच पशुधणास टेगिंग हे सन 2012 पासून सुरू झालं आहे.
त्यावेळी जी जनावरे नोंद झाली ती आता अस्तिवात नाहीत, त्यामुळे पशुपालक यांचे नावावर अतिरिक्त पशु दिसत आहे, ज्यांचेकडे सध्या दोन जनावरे असले तरी त्यांचे नावावर 10 ते 15 जनावरे दिसत आहे, ॲप मध्ये अश्या नोंदी वेगळ्या लिहून ते टॅग कमी करण्याकरिता वरीष्ठ कार्यालयकडे माहिती पाठविण्यात येणार आहे, करिता सदर पशु गणनेस संपूर्ण पशुपालक यांनी सहकार्य करावे, तसेच जनावरे सकाळी 7 ते दुपारी 12 वाजता पर्यन्त घरी ठेवावी हि विनंती ही डॉक्टर अमोल डेकाटे सौंदड यांनी केली आहे.
