साकोली, दी. 07 डिसेंबर : भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी नजीक असलेल्या सिरेगाव/टोला येथे मोटारसायकलवर जात असताना मोबाईल फोनचा खिश्यात स्पोट होऊन एकाचा दुर्देयवी मृत्यु तर एक जण जखमी झाल्याची घटना दि. 06 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान घडली, सुरेश भिकाजी संग्रामे वय 54 वर्षे रा.सिरेगाव/टोला ता.साकोली जि.भंडारा असे मृतकाचे नाव आहे तर चालत्या गाडीवरुन पडुन नत्थु गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर असे की सुरेश संग्रामे हे आपल्या नातेवाईकांकडे नत्थु गायकवाड यांचे सोबत जेवन करायला सिरेगाव/टोला येथुन मोटारसायकलने घरुन निघाले असता काही अंतरावरतीच सुरेश संग्रामे यांच्या शर्ट च्या खिशात असलेल्या मोबाईल फोनचा स्पोट होऊन कपड्याला आग लागली त्या आगीत त्यांचे शरीर भाजले, त्यांना उपचारा करिता हलविले असता त्यांचा मृत्यु झाला तर मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले झाले आहेत.
त्यांचे भंडारा येथील लक्ष हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. मृतक सुरेश भिकाजी संग्रामे हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या देसाईगंज/वडसा पंचायत समिति अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसारी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांचा अपघाती दुर्देयवी मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आहे. मोबाइल कोणत्या कंपनीचा होता या बाबद माहिती मिळू शकली नाही.
