एस.टी. प्रशासनाकडून शिवशाही बसची सेवा थांबवण्याचा निर्णय

गोंदिया, दी. 02 डिसेंबर : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात राज्य मार्ग क्रमांक : 753 वर 29 नोव्हेंबर रोजी शिवशाही बसचा अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाला तर 29 प्रवाशी गंभीर जख्मी झाले. त्या मुळे बस बद्दल तक्रारी आता समोर आल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी या आधी शिवशाही बसचे अपघात झाले आहेत.

बसमध्ये तांत्रिक दोष असल्याचंही आढळून आलं होतं. दरम्यान, आता राज्य परिवहन महामंडळाकडून शिवशाहीला ब्रेक लावला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एस.टी. प्रशासनाकडून शिवशाही बसची सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काही वृत्त वाहिन्यांनी प्रकाशित करीत दिली आहे.  बसमधील तांत्रिक दोष समोर आल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं समजते. शिवशाही बस बंद करून या बसेसचं रुपांतर लालपरीत होणार असल्याची देखील माहिती आता समोर येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें