“सडक अर्जुनी तालुक्याचा पोरगा” झाला जिल्हा परिषद गोंदियाचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) , दी. ०१ डिसेंबर : निवड सूची २०२३ – २४ करीता महाराष्ट्र विकास सेवा गट – अ  मधील गट विकास अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तात्पुरती पदोन्नती देण्याबाब चे शासन परिपत्रक २६ नोव्हेंबर रोजी निघाले यात अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. फरेंद आर. कुतिरकर यांना देखील पदोन्नती मिळाली आहे. ते पूर्वी उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक ( मग्रारोहयो ) चंद्रपुर येथे कार्यरत होते.

आता गोंदिया जिल्हा परिषद ( सामान्य प्रशासन,) विभाग रिक्त पदी उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून फरेंद आर. कुतिरकर यांची पदोन्नती करीत बदली करण्यात आली असून ०९ डिसेंबर रोजी आपल्या कार्य स्थलावर ते रुजु होणार आहेत.

विशेष म्हणजे गडचिरोली जिल्हा परिषद येथे ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असताना सन २०१८- १९ या वर्षाकरिता गुणवंत अधिकारी म्हणून राज्यपाल भगत शिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते.

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते ओळखले जातात, तसेच ते मूळचे सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम जांभळी या गावातील रहिवाशी आहेत, त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २००९ ला पास केली आणि ते सेवेत रुजू झाले, आता त्यांची बदली गोंदिया येथे झाल्यामुळे सडक अर्जुनी चा पोरगा जिल्हा परिषद गोंदियाचा नवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी  झाल्यामुळे तालुक्याचा गौरव उंचावला आहे.

Leave a Comment

और पढ़ें