गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दी. 30 नोव्हेंबर : गोंदिया जिल्ह्याला स्थानिक पालक मंत्री मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे, अश्यात वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या माहिती मध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकही आमदाराचे मंत्र्यांच्या यादीत नाव नाही, त्या मुळे पुन्हा गोंदिया जिल्ह्याला “झेंडा वंदन” करणारेच पालक मंत्री मिळणार का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे, महायुती आघाडीला गोंदिया जिल्ह्यात दणदणीत विजय मिळाला, जनतेने तब्बल चार आमदार जनतेने निवडून दिले, तरी बाहेरील मंत्र्यांना गोंदिया जिल्ह्याचा पालक मंत्री पद मिळणार अशी चर्चा आहे, त्या मुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
राज्यात नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानीपत केल्यानंतर आता राज्यात महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट चित्र आहे. अश्यात 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथविधी होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार लॉबिंग सुरु आहे. महायुतीत कोणा – कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता असतांनाच आता संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली. लेट्सअप ने दिलेल्या माहिती नुसार 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद असा महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे.
भाजपचे 132 आमदार निवडून आल्यानं मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक 15 मंत्रिपदं मिळणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला 11 तर, अजित पवार गटाला 7 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. भापजकडून देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार यांच्यासह 15 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
शिंदे गटाकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तर अजित पवार गटाकडून अजित पवार धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह 7 नावांची चर्चा आहे.
- भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. रवींद्र चव्हाण
4. मंगल प्रभात लोढा
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. आशिष शेलार
7. नितेश राणे
8. शिवेंद्रसिंहराजे भोसले
9. राहुल कुल
10.माधुरी मिसाळ
11. संजय कुटे
12. राधाकृष्ण विखे पाटील
13. गणेश नाईक
14. पंकजा मुंडे
15. गोपीचंद पडळकर तर भाजपच्या या यादीत विजयकुमार गावित आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावांचा समावेश नसल्यानं त्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. - शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी
1. उदय सामंत
2. शंभूराज देसाई
3. गुलाबराव पाटील
4. संजय शिरसाट
5. भरत गोगावले
6. प्रकाश सुर्वे
7. प्रताप सरनाईक
8. तानाजी सावंत
9. राजेश क्षीरसागर
10. आशिष जैस्वाल
11. निलेश राणे - अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
1. धनंजय मुंडे
2. अदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. हसन मुश्रीफ
5. धर्मरावबाबा आत्राम
6. अजित पवार - 7. छगन भुजबळ
अशी नावे आहेत, गोंदिया जिल्ह्यातील एकही आमदाराचे नाव या यादीत नाही, त्या मुळे गोंदिया जिल्ह्याला यावेळी सुधा “झेंडा वंदन” करणारा पालक मंत्री मिळणार असल्याचे यावरून लक्ष्यात येते, अजित पवार गटाचे आमदार राजकुमार बडोले, तर भाजप पक्षाचे आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले अशी चार आमदार महायुती चे असून सुधा गोंदिया जिल्ह्यात स्थानिक मंत्री पद नाही.
त्या मुळे गोंदिया जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातील मंत्र्यांनाच पालक मंत्री पद मिळणार हे निछित झाले आहे. या पूर्वी देखील धर्मराव बाब आत्राम यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री पद होते, त्यांनी आपल्या पालक मंत्री पदाचा राजीनामा काही कारणास्तव दिल्याची मध्यंतरी चर्चा होती त्या मुळे ते पालक मंत्री पद अदिती तटकरे यांना देण्यात आले अशी ही चर्चा होती मात्र पुन्हा पालक मंत्री पद धर्मराव बाबा आत्रमा यांच्याकडे आले, गोंदिया जिल्ह्याला पाच वर्षात चार ते पाच पालक मंत्री मिळाले यात महाविकास आघाडी चे अनिल देशमुख, नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे, तर माहायुती सरकार चे पालक मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कडे पालक मंत्री पद होते, त्या मुळे जिल्ह्याचा विकास रखडल्याचे बोलले जाते, आता गोंदिया जिल्ह्याला स्थानिक पालक मंत्री हवा अशी मागणी होत आहे.