- भाजपचा कुठला नेता मुख्यमंत्री होणार अजुनही नीच्छीत नाही ?
गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दी. 27 नोव्हेंबर : सध्या राज्याच्या राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहेत, एकीकडे राज्यात झालेल्या निवडणुकीमुळे विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा 26 नोव्हेंबर रोजी दिला असून राज्यातील आमदारांचे देखील पदे आता रिक्त झाली आहेत, असे असताना देखील राज्यात मुख्यमंत्री पद आता रिक्त आहे.
महायुती सरकार ला मिळालेली भरघोस मते मुळे कोण मुख्यमंत्री होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. राज्यात या पूर्वी दोन उपमुख्यमंत्री होते, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार तर दुसरे भाजप चे देवेंद्र फडणवीस असे असून शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्य मंत्री पद होते, अश्यात नुकतेच पार पडलेल्या निवडणुकी मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दारुण पराभव झाला असून महायुती च्या नेत्यांना जनतेनी विश्वास दाखवत विजयी केले आहे.
अश्यात राज्याचा मुख्यमंत्री कोण आणि कुठल्या अक्षाचा होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अश्यात 2, 1, 2 असा फॉर्म्युला राहणार याची चर्चा सुरू असताना आता राज्याचे मुख्यमंत्री पद तब्बल 5 वर्षे करीता भाजप कडेच राहणार अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे, तर भाजपच्या कुठल्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळणार हे देखील अद्याप निश्चित झाले नाही. तर अन्य पक्षातील नेते मंडळी मुख्यमंत्री पदा बाबद या निर्णयाला मान्यता देतील का? की समोर काय घडामोडी घडणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार
त्याच बरोबर राज्यात सुरू असलेल्या राजकारणात नवं नवीन वृत्त आता समोर येत आहेत, महाविकास आघाडीतून शिवसेना पक्ष आता बाहेर पडणार असल्याचेही बोलले जात आहे.