भारताने एका दिवसात 64 कोटी मतांची मोजणी केली ? : एलन मस्क

मुंबई वृत्तसेवा, दी. 27 नोव्हेंबर : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आहेत. रिपब्लिकन पक्षाला विजयासाठी 270 इलेक्टोरल मतांची गरज होती, तर त्यांनी आतापर्यंत 312 इलेक्टोरल मते मिळवली आहेत. दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना 226 इलेक्टोरल मते मिळवण्यात यश आले.

टेसला आणि X चे सीईओ एलन मस्क भारतीय मतदान प्रक्रियेच्या प्रेमात पडले आहे. अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. त्या निवडणुकीची प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये तब्बल 18 दिवसानंतरही मतमोजणी सुरु आहे. दुसरीकडे भारतातील महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणूक आणि इतर राज्यातील विधानसभा पोटनिवडणुका झाल्या.

त्या सर्वांची मतमोजणी एका दिवसांत पूर्ण झाली. त्यामुळे एलन मस्क भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रेमात पडले आहे. भारतात 64 कोटी मते मोजली गेली. परंतु कॅलिफोर्नियातील 2.2 कोटी मतांची मोजणी अजून पूर्ण झाली नाही. त्यामुळे एलन मस्कने म्हटले, भारतात एका दिवसांत 64 कोटी मते मोजली गेली. पण आमच्या कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतमोजणी सुरु आहे.

एलन मस्क यांनी X वर भारतीय निवडणुकीचे उदाहरण दिले आहे. त्यावरुन आपल्या देशातील प्रशासनाला आरसा दाखवला आहे. एलन मस्क नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्या मंत्रिमंडळात असणार आहे. अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष निवडणूक होऊन दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात ही प्रक्रिया एका दिवसांत पूर्ण होते.

अमेरिकेत मतपत्रिकेवर मतदान होते.

कॅलिफोर्नियामध्ये मतांची मोजणी खूप काळजीपूर्वक केली जात आहे. निकालात काही आरोप होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. कॅलिफोर्नियामधील कायद्यानुसार, निकाल लावण्यासाठी अधिकाऱ्यांकडे 30 दिवसांचा कालावधी असतो. त्या दरम्यान प्रोव्हीजनल बॅलटची तपासणी केली जाते. हस्तक्षर मॅच केली जातात. त्यासाठी ऑडिटसुद्धा होते.

https://x.com/elonmusk/status/1860476995370455296?s=19

इलॉन मस्क यांनी X वर लिहिले, “भारताने एका दिवसात 64 कोटी मतांची मोजणी केली आणि इथे कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतांची मोजणी सुरू आहे.” त्यानंतर चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकेत निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज आहे का? याबाबत सोशल मीडियापासून माध्यमांपर्यंत चर्चा होत आहे.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आहेत. रिपब्लिकन पक्षाला विजयासाठी 270 इलेक्टोरल मतांची गरज होती, तर त्यांनी आतापर्यंत 312 इलेक्टोरल मते मिळवली आहेत. दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना 226 इलेक्टोरल मते मिळवण्यात यश आले.

Leave a Comment

और पढ़ें