माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पिंजून काढला मतदार संघ गावा गावात जाऊन केला प्रचार

सडक अर्जुनी, दि. 13 नोव्हेंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दि. 12 नोव्हेंबर रोजी मतदार संघ पिंजून काढत मतदारांशी संवाद साधला आहे. गेल्या 15 वर्षा पासून राजकारणात असलेले राजकुमार बडोले यांना या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना या निवडणुकित संधी दिली आहे, तर बडोले यांच्या प्रचाराची धुरा स्वतः खा प्रफुल पटेल आणी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते राजेंद्र जैन हे सांभाळत असून बडोले यांच्या शह गावा गावात जाऊन प्रचार करीत आहेत.

तर राजकुमार बडोले हे मंत्री असताना त्यांनी गोंदिया जिल्याचे पालक मंत्री असताना केलेली विकास कामे असो की कॅॅबिनेट मंत्री असताना राज्य पातळीवर देश पातळीवर केलेली कामे यांची माहिती स्वतः राजकुमार बडोले हे मतदाराना देतं असून येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याचे आव्हान माजी मंत्री तथा महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी मतदारांना केले आहे. तर त्यांच्या प्रचार दवऱ्यात मतदारांची देखील साथ मिळत असून राजकुमार बडोले हे गावात पोहचताच मतदार त्यांचे ठिक ठिकाणी स्वागत करीत आहेत.

 

Leave a Comment

और पढ़ें