पार्सल नको स्वयंघोषित दादा नको आणी इकडून तिकडे जाणारा नको आपल्या माणसाला मतदान करा : राजकुमार बडोले

सडक अर्जुनी, दि.11 नोव्हेंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी आज गोरेगाव तालुक्यात प्रचार रॅली काढत जण आशीर्वाद घेतला या रॅलीत गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहागडाले यांच्या शह महायुतीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

माजी मंत्री तथा महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना या मतदार संघाचा दांडगा अनुभव असून गेले 10 वर्ष या मतदार संघात राजकुमार बडोले यांनी प्रतिनिधित्व केले असून या निवडणुकीत राजकुमार बडोले हे महायुतीचे उमेदवार असल्याने गावा गावात जाऊन महाविकास आघाडी सरकारची कामे लोकांन पर्यत पोहचवून मत मागत आहे तर ठिक ठिकाणी राजकुमार बडोले यांचे आणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहागडाले यांचा गावकर्यांनी स्वागत केला असून आपलाच विजय होईल असा विश्वास राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला आहे.

र राजकुमार बडोले यांच्या प्रचार रॅलीत लहान पासून वयोवृद्ध नागरिक देखील सहभागी असून बडोले साहेब विजयी होतील असा विश्वास पंकज रहागडाले यांनी व्यक्त केला आहे. दि. 09 नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

और पढ़ें