गोरेगाव, दि. 11 नोव्हेंबर : क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिवर्तनासाठी शेतकरी, कष्टकरी यांच्या घामाला योग्य दाम देण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द आहे. ही विकासाची बांधिलकी व क्षेत्राच्या परिवर्तनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळण्यासाठी कणखर भूमिका घेवून विकास खेचून आणणारा नेतृत्व असला पाहिजेत आणि हे नेतृत्व श्री राजकुमार बडोले यांच्यात आहे. विकासासाठी आमची साथ त्यांना आहे त्यामुळे या भागाच्या विकासाची गती वाढेल त्यांना निवडूण देण्याची जबाबदारी तुमची व विकासाची बांधिलकी माझी आहे असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांनी केले.
ते ग्राम मोहाडी ता. गोरेगाव येथे मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार राजकुमार बडोले यांच्या निवडणूक प्रचारार्थ भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व आर पी आय मित्र पक्षांच्या संयुक्त सभेला दि. 10 नोव्हेंबर रोजी संबोधित करताना खासदार प्रफुल पटेल बोलत होते.
सभेला खा. श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री हेमंतभाऊ पटले, राजकुमार बडोले, लक्ष्मण भगत, किशोर गौतम, पंकज रहांगडाले, मनोज बोपचे, केवलभाऊ बघेले, शेषराव गिरीपुंजे, मनोज बोपचे, रामभाऊ हरिणखेडे, सोमेश रहांगडाले, महेंद्र चौधरी, कल्पना बहेकार, बाबा बोपचे सुरेंद्र रहांगडाले, बाबा बहेकार, रामभाऊ महारवाडे, बालू पटले, गजानन रहांगडाले, माणिक भगत, लालचंद चव्हाण, राजेश बिसेन, ललिता पुंडे, काशिनाथ भेंडारकर, बाबुलाल चौहाण, इंद्रराज बघेले, मोहन किशोर मौदेकर, एन के बिसेन, द्वारका प्रसाद धपाडे, एकनाथ पटले, मोहन पटले, रामदास चौधरी, दुलीचंद बघेले, गिरधारी बघेले, मायाबाई चौधरी, मिलिंद राउत, मंगला रहिले, यशोदा येडे, माणिक पारधी सहित मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.