गोरेगांव, दी. 07 नोव्हेंबर : लालचंद चव्हाण यांच्या निवास स्थान समोरील पटांगणावर ग्राम चिल्हाटी ता. गोरेगाव येथे खासदार प्रफुल पटेल व आ. परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ मित्रपक्ष संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी संबोधित करताना खासदार प्रफुल पटेल म्हणाले की देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास जलद गतीने होत असून कृषी, आरोग्य, गॅस, मोफत राशन जनधन योजना, उज्वला योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून देश प्रगती करीत आहे. राज्यात सुध्दा लाडली बहिण, किसान सन्मान, शेतकरी विज बिल मोफत, मुलींना निःशुल्क उच्च शिक्षण यारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. राज्यात व केंद्रात एकाच विचारधारेचे पक्ष सत्तेत असल्यास विकासाची गती वाढते. या क्षेत्राच्या विकासासाठी राज्यात महायुतीच्या उमेदवाराला बहुमतांनी निवडून आणा या क्षेत्राचा विकास करण्यास आम्ही मिळून जिम्मेदारी घेवू असे प्रतिपादन श्री पटेल यांनी केले.
सर्वश्री प्रफुल पटेल, परिणय फुके, राजकुमार बडोले, हेमंत पटले, प्रेमकुमार रहांगडाले, रेखलाल टेंभरे, मनोज बोपचे, केवलभाऊ बघेले, लक्ष्मण भगत, विशाल शेंडे, सोमेश रहांगडाले, संजय बारेवार, जगदीश बावनथडे, हर्ष मोदी, कृष्णकुमार बिसेन, श्रीप्रकाश रहांगडाले, बाबा बोपचे, लालचंद चौहान, महेंद्र चौधरी, सुरेंद्र रहांगडाले, प्रतीक पारधी, विनोद रहांगडाले, चौकलाल येडे, राजेश बिसेन, रामू महारवाडे, बाबा बिसेन, बाबा बहेकार, चित्रकला चौधरी, श्रद्धा रहांगडाले, उषा रामटेके, अंकित रहांगडाले, रवींद्र पटले, रामेश्वरी रहांगडाले, गिरधारी कटरे, अनिता तुरकर, ललिता पुंडे, नितेश येल्ले, रामु हरिणखेडे, कल्पनाताई बहेकार, नलिनी बिसेन, श्याम फाये, अतुल मोटघरे, शशी ताई फुंडे, राकेश बघेले, तूषित पटले, विश्वजीत डोंगरे, माणिकभाऊ पारधी, देवचंद सोनवणे, जेडी जगनीत, झुमक भाऊ बिसेन, अविनाश भेंडारकर, माणिकभाऊ भगत, सुरेश हरिणखेडे, किशोर गौतम सहीत मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.