निवडून आल्यावर सर्व घटक पक्षांना बरोबरीचा विकास निधी देऊ : माजी आ. संजय पुराम

आमगाव, दि. 06 नोव्हेंबर : आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी आमगाव शहरात आयोजित महायुतीच्या सभेला हजेरी लावत उपस्थिताना दि. 06 नोव्हेंबर रोजी मार्गदर्शन केले तर ज्या ज्या मित्रपक्षांनी मला साथ दिली अस्या सर्व मित्र पक्षांना निवडून येताच आमदार विकास निधीचा निधी बरोबर देऊ ज्यामुळे त्यांच्या क्षेत्रात देखील विकास कामे होऊ शकतील असे संजय पुराम म्हणाले. 

तर या सभेला आमगाव शरतील एकनाथ शिंदे गटाचे शिव सैनिक आणी इतर घटक पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हजेरी लावत संजय पुराम यांना बहुमताने निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला आहे तर संजय पुराम यांनी देखील मतदारांना येत्या 20 ऑक्टोबर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात कमळ चिन्हाची बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा आव्हान केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें