देशाच्या राजकारणात दम ठेवणारे प्रफुल्ल पटेल यानांच आपल्या जिल्ह्यात बंडखोरी थांबण्यात यश आले नाहीं ?

अर्जुनी मोरगाव, दि. 04 नोव्हेंबर : गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघा पैकी एका मतदार संघात बंडखोरी झाली आहे. मोरगाव अर्जुनी मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्थानिक आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची तिकिट कापली आणि भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांना पक्ष प्रवेश देत त्यांना तिकिट दिली.

त्यामुळे नाराज असलेल्या आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी प्रहारची बॅट हातात पकडत आपल्या मुलाला मैदानात उतरवल आहे. चंद्रिकापुरे यांनी स्वतः प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप करत माझ्या पाठीत खंजीर खुपसला असा उल्लेख केला. तर काँग्रेस कडून दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिली आहे.

मोरगांव अर्जुनी मतदार संघात आता तिरंगी लढत होणार असुन याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होते ते पेटी उघडल्यावर कळेल. देशाच्या राजकारणात दम ठेवणारे प्रफुल्ल पटेल यानांच आपल्या जिल्ह्यात बंडखोरी थांबण्यात यश आलें नाहीं. त्यामुळे निवडणुकीचे समीकरण काय होणार ते पाहण्सारखे असेल, अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढण्यासाठी 35 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यातील 16 उमेदवारांनी आपलं अर्ज मागे घेतले आहेत, तर 19 उमेदवार निवडणूक लढणार आहेत.

 

Leave a Comment

और पढ़ें