- 70 हजार कोटी मध्ये किती तरी लोकांच भल झालं असत : माजी मंत्री बच्चु कडू
सडक अर्जुनी, दि. 29 ऑक्टोंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांने तिकीट कापल्याने आमदर पुत्र डॉ. सुगत चंद्रिकापुरे यानी प्रहार संघटनेच्या वतीने अर्जुनी मोरगाव विधानसभे करिता आज दि. 29 ऑक्टोंबर रोजी नामांकन अर्ज दाखल केला आहे.
पाच वर्ष आमदार राहीलेले मनोहर चंद्रिकापुरे यांची खा. प्रफुल पटेल यांनी तिकीट कापत भाजप नेते माजी मंत्री राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करून घेत महायुतीच्या वतीने उमेदवारी दिली त्यामुळे डॉ सुगत चंद्रिकापुरे यांनी खा. प्रफुल पटेलानी माझ्या पाटीत खंजीर खुपसलं त्यामुळे निवडणूक तर लढणार अशी भूमिका घेत बच्चू कद्दू यांच्या प्रहार संघटनेत प्रवेश घेत आज नामांकन अर्ज दाखल केला आहे.
तर पूर्व विदर्भाच्या टोकावर असलेल्या गोंदिया जिल्यात डॉ. सुगत सारखा उमेदवार मला मिळालं त्यामुळे नक्कीच या ठिकाणी ब्याट हा निवडणूक चिन्ह डॉ. सुगत यांच्या माध्यमातून निवडून येईल असा विश्वास आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या रॅली मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्या मुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेचा आशीर्वाद डॉक्टर यांना मिळेल आणि ते भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यानी व्यक्त केला जात आहे.
- 70 हजार कोटी मध्ये किती तरी लोकांच भल झालं असत : माजी मंत्री बच्चु कडू
70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या फाईल वर आर. आर. पाटील यांची सही होती. केसांनी गळा कापण्याचे काम केलं. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी फाईल दाखविली असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. तर आता हि बतावणी करून काही फायदा नाहीं.
दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे होता. 70 हजार कोटी मध्ये किती तरी लोकांचं भल झालं असत. किती लोकांचे आयुष्य बदलले असते. आमच्या असला तर देव झालं व तुमच्यात आहे म्हणून सैतान आहे. अशी भूमिका काही पार्टीची आहे. त्याचा विरोध जनतेतून झालं पाहिजे असं वक्तव्य बच्चू कडू यांनी गोंदिया येथे केलं आहे.
