राजकुमार बडोले यांचे प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

  • राजकुमार बडोले हे चौथ्यांदा निवडणूक लढणार

सडक अर्जुनी, दि. 29 ऑक्टोंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी नामांकन अर्ज दि. 28 ऑक्टोंबर रोजी दाखल केले आहे, यावेळी खा. प्रफुल पटेल उपस्थित होते, तर अर्जुनी मोरगाव येथे सभा आयोजीत करण्यात आली होती. क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, कष्टक-यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांच्या पाठबळ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना बहुमताने निवडून द्या. असे आवाहन खा. प्रफुल पटेल यांनी उपस्थित जनसमुहाला संबोधतांना केले.

यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, यशवंत गणवीर, लोकपाल गहाने, किशोर तरोने, अविनाश काशिवार, हर्ष मोदी, लायकराम भेंडारकर, ममता भैय्या व हजारोंच्या संख्येने उपस्थित होते, क्षेत्रांतील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, उपस्थित कार्यकर्त्यांनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यासोबत उभे राहत त्यांच्या शक्ती प्रदर्शनात सहभाग दर्शवला, आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला निवडून देऊ असाच संदेश या निमित्ताने दिला आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील माजी मंत्री राजकुमार बडोले हे चौथ्यांदा निवडणूक लढणार आहेत.

यापूर्वी तीन वेळा त्यांनी भाजप पक्षातून उमेदवारी लढवली होती, तर ते दोनदा आमदार झाले होते, एकदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, आता महायुतीच्या वतीने त्यांना ही उमेदवारी देण्यात आली, आणि ही उमेदवारी मिळवीण्यासाठी राजकुमार बडोले यांनी भारतीय जनता पक्षाला राम राम करीत राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे, राजकुमार बडोले यांच्या पक्ष प्रवेशामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची उमेदवारी कापण्यात आली. त्यामुळे महायुतीतील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे, येत्या निवडणुकीमध्ये याचा काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे असेल. 

Leave a Comment

और पढ़ें