विजय रहांगडाले यांनी खा. प्रफुल पटेलांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज भरला.

तिरोडा, दिं. 29 ऑक्टोंबर : तिरोडा विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार विजय राहागडाले यांनी खा. प्रफुल पटेलांच्या उपस्थितीत तिरोडा उप विभागीय अधिकारी कर्यलयात दि. 29 ऑक्टोंबर रोजी नामांकन अर्ज दाखल केला आहे.

तिरोडा विधानसभा क्षेत्रातुन भरतीय जनता पक्षाचे आमदार विजय रहागडाले हे 2014 पासून तिरोडा विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधित्व करीत असून 2014 ते 2024 पर्यत आमदार असल्यासने त्यांनी मतदार संघात अनेक विकास कामे केल्याने या निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे.

तर विजय राहगडाले यांनी भव्य रॅली काढत नामांकन अर्ज दाखल केला असून यां रॅलीत महायुतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यानी हजारोच्या संख्येत हजेरी लावली असता आपलाच विजय होईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार विजय रहागडाले यांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें