- संजय पुराम यांना तिसऱ्यांदा पक्षाने निवडणूक लढण्याची दिली संधी.
देवरी, दि. 29 ऑक्टोंबर : आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी 28 ऑक्टोंबर रोजी देवरी उप विभागीय कार्यलयात नामांकन अर्ज दाखल केला.
संजय पुराम यांना आंमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातुन भरतीत जनता पक्षाने तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत संजय पुराम निवडून आले होते, तरी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त 7 हजार 400 मतांनी पराभूत झाले होते, मात्र गेल्या 10 वर्षात त्यांनी विधानसभा क्षेत्रात केलेली विकास कामे पाहता भरतीय जनता पक्षाने त्यांना 2024 ची विधानसभा निवडणूक लढण्याची संधी दिली आहे.
संजय पुराम यांनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केला असून आपलाच विजय होईल असा विश्वास संजय पुराम यांनी व्यक्त केला आहे. तर या नामांकन रॅलीत हजरोच्या संख्येत नागरिकांनी उपस्थित होत संजय पुराम यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहत निवडून आणू असा विश्वास संजय पुराम यांना दिला आहे.