पार्सल मागे घ्यावा म्हूणन काँग्रेस कार्यकर्त्यानी नाना पटोले व प्रशांत पडोळे यांचा ताफा अडवला

  • अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात कॉग्रेस पक्षाने उमेदवार रुपी दिलेला पर्शाल नको!

गोंदिया, दि. 29 ऑक्टोंबर : काँग्रेस पक्षाने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात बाहेरच्या उमेदवाराला विधानसभेची तिकीट दिल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप बनसोड हे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आले असताना काँग्रेस कार्यकर्त्यानी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व खा. डॉ. प्रशांत पडोळे यांचा ताफा अडवून बाहेर गाऊन आणलेला पार्सल वापस घ्यावा व स्थानिक नेत्यांना निवडणूक लढण्याची संधी द्यावी अशी मागणी केली होती.

  • दुचाकी वाहनाने पळ काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

तर बाहेरचा उमेदवार असल्याने काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणी खा. डॉ प्रशांत पडोळे यांना कार्यकर्त्यांच्या रोशाला समोर जावे लागले, दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यात आले, तर माजी आमदार दिलीप बनसोड हे सदर ठिकाणावरून दुचाकी वाहनाने पळ काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोध प्रदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना माजी आमदार दिलीप बनसोड घाबरून पळत असल्याचे तसेच पार्सल वापस जात असल्याचे कमेंट देखील केली जात आहे. 

  • बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत पक्षाबाहेर हकाल पट्टी

अर्जुनी मोरगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी माजी आमदार दिलीप बनसोड व महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते, हा सर्व प्रकार पाहता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी सभापती राजेश नंदागवळी व अजय लांजेवार यांना सहा वर्षाकरिता काँग्रेस पक्षामधून निष्काशीत केल्याचे वृत्त समोर आले आहे.

अजय लांजेवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील कुठल्याही उमेदवाराला महाविकास आघाडीची उमेदवारी नाना पटोले यांनी दिली असती तर आमचा कुठलाही आक्षेप नव्हता मात्र बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने हा पार्सल इथे चालणार नाही.

असे त्यांनी सांगितले तसेच अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील 12 उमेदवारांपैकी एक उमेदवार आम्ही उभा करणार आहोत असेही त्यांनी सांगितले याबाबत त्यांनी एक दिवसापूर्वी पत्रकार परिषद देखील घेतली होती मात्र नाना पटोले यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवून पार्सल मागे घ्या अशी मागणी केली होती, मात्र विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत पक्षाबाहेर हकाल पट्टी केली आहे. त्यामुळे येत्या काळात अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात काय बदल होतात हे पाहण्यासारखे असेल. 

 

 

Leave a Comment

और पढ़ें