काँग्रेस कार्यकर्त्यानी बंडखोरी करीत पाच लोकांनी भरले नामांकन अर्ज

  • तिरोडा विधानसभा क्षेत्रात, राष्ट्रवादी शरद पवार गटाला तिकीट गेल्याने केला विरोध

गोंदिया, दि. 29 ऑक्टोंबर : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया जिल्याच्या तिरोडा विधानसभा क्षेत्राची पारंपारिक जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुडू बोपचे यांना दिल्याने संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही जागा बदलून कॉग्रेस पक्षाला द्यावी या साठी काँग्रेस पक्षांच्या एका जिल्हा परिषद सदस्यां सह इतर पाच लोकांनी नामांकन अर्ज 28 ऑक्टोंबर रोजी दाखल केला आहे.

तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या जागे बद्दल योग्य निर्णय घेऊन ही जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला दिली नाही तर नामांकन भरलेल्या सहा लोकांना पैकी एक व्यक्ती निवडणुकीत उभा राहून अपक्ष निवडणूक लढेल अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यानी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्यात कॉग्रेस पक्षात चालले काय असा प्रशन सर्व सामान्य लोकांना पडला आहे. जितेंद्र कटरे जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस कार्यकर्ते यांनी अशी माहिती मीडिया शी बोलताना दिली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें