- महायुतींच्या कार्यकर्त्यांमध्ये बंडखोरी होण्याचे संकेत?
सडक अर्जुनी, दिनांक : 27 ऑक्टोबर 2024 : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भारतीय जनता पक्षाला रामराम करीत राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटात 22 ऑक्टोंबर रोजी अधिकृत रीत्या प्रवेश केला आहे.
त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी गोंदिया जिल्हा अध्यक्ष येसुलाल उपराळे यांच्या मार्फत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी निवेदन दि. 25 ऑक्टोबर रोजी दिले आहे.
निवेदन देतेवेळी ॲड. पोमेस रामटेके जिल्हा महामंत्री अनुसूचित जाती, जमाती सेल, प्यारेलाल गौतम गोरेगाव पत्रकार आघाडी, ललित कुमार बाळबुद्धे अध्यक्ष सेवा सहकारी संघ अर्जुनी मोरगाव यांनी निवेदन दिले आहे. भारतीय जनता पक्षातून दोनदा आमदार राहिलेले तसेच एकदा मंत्री राहिलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भारतीय जनता पक्षाला राम राम केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, हे महायुतीचे घटक पक्ष आहेत, असे असले तरी आपल्या पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते त्यांना या गोष्टी पचण्यासारखे नाही.
त्यामुळे माजी मंत्री राजकुमार बडोले यांना भारतीय जनता पक्षातून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी निवेदन करण्यात आली आहे. आणि तसे न झाल्यास कार्यकर्ते स्वतः निर्णय घेतील असेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराला मतदान करतीलच असे नाही.
