रविकांत बोपचे तीरोडा, तर चरण वाघमारे तुमसर या जागेवरून उमेदवारी नीच्छीत!

  • अर्जुनी मोरगाव व गोंदिया विधानसभा क्षेत्रातील उमेदवारी पेचात?

गोंदिया, दि. 24 ऑक्टोंबर : गोंदिया भंडारा जिल्ह्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे, हा जिल्हा प्रफुल भाई पटेल यांचा गड असून नाना पटोले यांचे देखील या भागात वर्चस्व आहे, असे असताना देखील या भागातील महाविकास आघाडीचे उमेदवारांचे अध्यापही उमेदवारी निश्चित झाले नाही त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे, की महाविकास आघाडी च्या वतीने कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला कुठून उमेदवारी मिळणार याची प्रतीक्षा या भागातील उमेदवारांमध्ये तसेच मतदारांमध्ये आहे.

महायुती कडून गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र यात साकोली विधानसभेची उमेदवारी अद्याप निश्चित झाली नाही.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि यामध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील दोन उमेदवारांची उमेदवारी निश्चित केली आहे. यामध्ये रविकांत बोपचे तीरोडा, गोरेगाव, तर चरण वाघमारे तुमसर, मोहाडी या जागेवरून उमेदवारी नीच्छीत झाली आहे, मात्र काँग्रेस पक्षाकडून अद्यापही गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांची अद्यापही यादी जाहीर केली नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात सभ्रम निर्माण झाला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की तीनही पक्षांनी प्रत्येकी ८५ जागांवर एकमत केले आहे. उरलेल्या जागांवर मित्रपक्षांशी चर्चा करून त्याही जागा लवकरच जाहीर केल्या जातील. तीनही पक्ष २७५ जागा लढविणार असून उरलेल्या जागा मित्रपक्षांना देण्यात येतील. पुढील दोन दिवसांत महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा जाहीर केला जाईल, असेही जयंत पाटील म्हणाले. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची उमेदवारी काँग्रेसला जाणार की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला जाणार हा देखील सभ्रम येथील उमेदवारांना पडला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली.

इस्लामपूर – जयंत पाटील

काटोल – अनिल देशमुख</p>

घनसावंगी – राजेश टोपे

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील

मुंब्रा कळवा – जितेंद्र आव्हाड</p>

कोरेगाव – शशिकांत शिंदे

वसमत – जयप्रकाश दांडेगावकर

जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर

इंदापूर – हर्षवर्धन पाटील

राहुरी – प्राजक्त तनपुरे

शिरूर – अशोक पवार

शिराळा – मानसिंगराव नाईक

विक्रमगड – सुनील भुसारा

कर्जत जामखेड – रोहित पवार

अहमदपूर – विनायकराव पाटील

सिंदखेडराजा – डॉ. राजेंद्र शिंगणे

उदगीर – सुधाकर भालेराव

भोकरदन – चंद्रकांत दानवे

तुमसर – चरण वाघमारे

किनवट – प्रदीप नाईक

जिंतूर – विजय भांबळे

केज – पृथ्वीराज साठे

बेलापूर – संदीप नाईक

वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे

जामनेर – दिलीप खोडपे

मुक्ताईनगर – रोहिणी खडसे

मुर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे

नागपूर पूर्व – दुनेश्वर पेठे

तिरोडा – रविकांत बोपचे

अहेरी – भाग्यश्री आत्राम

बदनापूर – रुपकुमार चौधरी

मुरबाड – सुभाष पवार

घाटकोपर पूर्व – राखी जाधव

आंबेगाव – देवदत्त निकम

बारामती – युगेंद्र पवार

कोपरगाव – संदीप वर्पे

शेवगाव – प्रताप ढाकणे

पारनेर – रानी लंके

आष्टी – महेबुब शेख

करमाळा – नारायण पाटील

सोलापूर उत्तर – महेश कोठे

चिपळून – प्रशांत यादव

कागल – समरजीत घाटगे

तासगाव-कवठे महांकाळ – रोहित पाटील

हडपसर – प्रशांत जगताप ही नावे त्यांनी सांगितले आहे. 

 

Leave a Comment

और पढ़ें