चुलबंद नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा, फुटाळा परिसरात डम्पिंग, सिंधीपार मार्गे वाहतूक सुरू

  • वाळू माफियांवर महसूल विभागाचा आशीर्वाद!

सडक अर्जुनी, दिनांक : 24 ऑक्टोंबर 2024 : सडक अर्जुनी तालुक्यात आज घळीला एकही रेती घाटाचा लिलाव झाला नसला तरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने रेतीचा उपसा सुरू आहे, आणि मुख्यतः फुटाळा गाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची डंपिंग केली जात आहे, ही वाळू चुलबंद नदीच्या पात्रातून अवैध मार्गाने उपसा करून विविध ठिकाणी साठवन केली जात आहे, तर जेसीबीच्या माध्यमातून ट्रक मध्ये भरून त्याची वाहतूक सिंधीपार मार्गाने केली जात आहे. असे असले तरी बडे अधिकारी सांगतात आम्हाला वाहने मिळतच नाही.

रेती उपसा अगोदर रात्रीलाच व्हायचा मात्र आता दिवसाला सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे, आणि या अवैध गौन खनिज उत्खननावर महसूल विभागाचा कुठलाही लक्ष नाही त्यामुळे फुटाळा, सौंदड, पिपरी, पळसगाव या भागातून रोज शेकडो ट्रिप रेतीचा उपसा होत आहे, महसूल विभाग या अवैध गौन खनिज उत्खननावर कधी लगाम लावणार याकडे स्थानिक शेतकऱ्यांचे देखील लक्ष लागले आहे, या भागातून दरवर्षी कोट्यावधी रुपयाची वाळू नदीपात्रातून उपसा केली जाते, त्यामुळे महसूल विभागाला देखील याचा फटका बसतो, सातत्याने होत असलेल्या वाळू उपसा मुळे, गाव मार्गाचे आणि शेती मार्गाचे देखील रस्ते संपूर्ण खराब झाल्याचे चित्र आहे, आणि याचा फटका मार्गाने चालणाऱ्या सामान्य माणसाला सहन करावा लागत आहे.

फुटाळा गावात आणि गाव परिसरात वाळू स्टॉप करण्याचे जवळपास पाच ते सहा ठिकाण आहेत, नदीपात्रातून वाळूचा उपसा करण्यासाठी जवळपास दहा ते वीस वाहनांचा वापर करून वाळू डम्पिंगच्या ठिकाणी आणली जाते तर हीच वाळू जेसीबीच्या माध्यमाने मोठ्या ट्रक मध्ये भरून सिंधीपार मार्गाने देवरी, नवेगावबांध, गोरेगाव कडे विक्रीसाठी पाठवली जाते, आता हा प्रकार गेले एक महिन्यापासून सुरू आहे आणि असे असताना देखील अद्याप तरी या वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात महसूल विभागाने कुठलीही कारवाई केल्याचे चित्र दिसत नाही, त्यामुळे महसूल विभाग आणि पोलीस विभाग याकडे लक्ष देतील का ? आणि या अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तथाकथित वाळू माफियांवर कारवाई करणार का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें