भाजपाला गोंदियात पुन्हा धक्का ! माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पक्ष प्रवेश करीत हाताला बांधली घळी

  • तर आमदार मनोहर चंद्रिकापुरे तुतारी पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा!
  • अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षात आमना सामना होण्याचे चित्र.

सडक अर्जुनी, दि. 23 ऑक्टोंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते राजकुमार बडोले यांनी दिनांक : 22 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या सह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी वाटेल त्या थराला जाण्यासाठी तयार आहेत असे चित्र निर्माण झाले आहे, राज्यामध्ये पक्ष फोडाफोडी चे राजकारण झाल्यानंतर आता स्वतःच्या स्वार्थासाठी नेते मंडळी कधी कुठल्या पक्षात जातील याचा काही नेम नाही, कुठलाही नेता आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आहे असे आजच्या घडीला सांगणे कठीण आहे.

त्या मुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील मतदाता सभ्रमात होता, की या भागातील महायुतीचा उमेदवार कोण ? राहील आणि कुठल्या पक्षाला उमेदवारी मिळेल भाजप की राष्ट्रवादी असा पेच निर्माण झाला होता, असे असताना राजकुमार बडोले हे शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये जाणार अशी चर्चा काही दिवसा पूर्वी रंगू लागली होती, मात्र राजकुमार बडोले यांनी ती चर्चा खोटी असल्याचे सांगितले आणि सोशल मीडियावर अशा पोस्ट पसरवणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्या संदर्भात लेखी तक्रार देखील दिली होती.

त्याच बरोबर पुन्हा एक चर्चा उडाली की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घळी या पक्षात ते पक्षप्रवेश करणार अशी ही चर्चा रंगू लागली होती, मात्र राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की हे सगळं खोटं आहे, आपण भारतीय जनता पक्षात राहणार कुठेही जाणार नाही, असे ते बोलले होते, मात्र दोन दिवसाचा कालावधी उलटताच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याच्या बातम्या समोर आल्या त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जनतेला पुन्हा धक्का मिळाला, या भागातील मतदारांमध्ये पक्षा विषयी आणि उमेदवारा विषयी विश्वास राहिला नाही, त्यामुळे मतदार सोशल मीडियाच्या माध्यमातून नेत्यानवर टिप्पणी करत असल्याचे चित्र आहे.

राजकुमार बडोले यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या येताच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे देखील शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत, तशा बातम्याही समाज माध्यमावर झळकू लागल्या आहेत. आणि असे झाल्यास अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटात म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या तुतारी आणि अजित पवार यांच्या घडी या दोन्ही पक्षांमध्ये लढत होणार असे चित्र समोर येत आहेत, मात्र या दोन्ही नेत्यांना या पक्षातून तिकीट मिळणार का ? हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे, नेत्यांच्या पक्ष प्रवेशानंतर पक्षाने यांना तिकीट न दिल्यास या दोन्ही बळ्या नेत्यांना जनते मध्ये जाण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग उरणार नाही हे ही तितकेच सत्य आहे.

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा मुलगा सुगत चंद्रिकापुरे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे येत्या काळात काय होणार हे पाहण्यासारखे असेल.

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची उमेदवारी काँग्रेस पक्षाला जाणार अशीही चर्चा आहे, त्यामुळे विद्यमान आमदार काँग्रेस पक्षात तर जाणार नाही ना हे देखील पाहण्यासारखे असेल, दुसरीकडे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात तब्बल 16 ते 17 उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेमध्ये आहेत त्यांनी कोट्यावधी रुपयाचा खर्चही बॅनर पोस्टर वर केला आहे. आणि या भागातील उमेदवारी जर राष्ट्रवादी पक्षाला गेल्यास काँग्रेस पक्षातील प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांमधून काय प्रतिक्रिया येणार हे पाहण्यासारखे असेल.

 

Leave a Comment

और पढ़ें