दिवाळीच्या तोंडावर, राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे साम्राज्य!

सडक अर्जुनी, दि. 22 ऑक्टोंबर : राष्ट्रीय महामार्ग नागपूर ते रायपूर वर अनेक ठिकाणी उड्डाण पूल निर्मितीचे काम सुरू आहेत, अश्यात उड्डाण पुलाच्या बाजूने जाणाऱ्या सर्व्हिस मार्गाची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे, उखडलेल्या मार्गावरून वाहन चालत असताना मोठ्या प्रमाणात धुळ उडते, परिणामी महामार्गावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरते या मुळे मोटर सायकल चालक व परिसरातील नागरिकांना धुळीचा सामना करावा लागतो, धुळी मुळे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उड्डाण पुलाची निर्मिती करणाऱ्या कंपनी कडून हवेत उडणाऱ्या धुळीची काळजी घेतली जात नाही, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड ते फुटाळा, व डूग्गीपार, तर देवरी तालुक्यातील मासुलकसाघाट, देवरी चेकपोस्ट समोर देखील उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे, या मार्गाने चालणाऱ्या नागरिकांना कमालीचा सामना करावा लागतो परिणामी या भागात अपघात होत आल्याचे चित्र आहेत. समोर दिवाळी तोंडावर आहे, अश्यात मार्गाने चालणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची बांधकाम कंपनी खबरदारी घेणार का ?

Leave a Comment

और पढ़ें