भाजपची पहिली यादी, गोंदिया जिल्ह्यातील तीन विधानसभेचा समावेश!

  • आजी माजी आमदाराना तिकिट जाहिर

गोंदिया, दि. 20 ऑक्टोंबर : आज भाजपची पहिली यादी जाहिर झाली आहे. या यादीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे आहेत. विनोद अग्रवाल गोंदिया, विजय रहांगडाले तिरोडा, तर संजय पुराम आमगाव यांना तिकिट जाहिर झाली आहे. गोंदिया, तिरोडा विद्यमान आमदार आहेत तर आमगाव येथिल माजी आमदार यांना भाजपने संधी दिली असून अर्जुनी मोरगाव विधानसभा येथील उमेदवारी अजून निश्चित झालेली नसल्याने सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.

त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची उमेदवारी भारतीय जनता पक्षाला जाते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाते याकडे या क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागून आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले हे भाजप पक्षाचे या भागातील संभावित उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे आहेत त्यामुळे ही उमेदवारी पेचात सापडली आहे.

Leave a Comment

और पढ़ें