- 8 लक्ष 68 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
गोंदिया, दि. 19 ऑक्टोंबर : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक रामनगर पोलिस स्टेशन च्या हद्दित पेट्रोलिंग करीत असताना 17 ऑक्टोंबर च्या सायंकाळी रेलटोली मालधक्का परिसरात रेल्वे स्टेशन कडून हनुमान मंदीर कडे जातांना एक ईसम ट्रॉली बॅगसह संशयास्पद स्थितीत दिसून आल्याने त्यास थांबवून त्याची चौकशी विचारपूस केली असता ईसम नामे – सतीश दीनानाथ उपाध्याय वय 25 वर्षे राहणार – तीलवारा घाट, ता. गोरखपुर, जिल्हा – जबलपूर ( म. प्र. ) ताब्यात दोन ट्रॉली बॅग, व एक स्ल्याक बॅग दिसून आल्याने सदर बॅग मध्ये काय आहे.
बाबत पोलिसांनी चौकशी केली असता सुरवातीला आरोपी ने उडवा उडविचे उत्तरे देत असल्याने त्याचे ताब्यातील दोन्ही ट्रॉली व स्ल्याक बॅग ची पाहणी केली असता दोन ट्रॉली बॅग, व स्ल्याक बॅग मध्ये प्लास्टिक चे चिकट टेप पट्टी ने वेस्टन केले असलेले एकूण 14 नग पॉकिटे दिसून आलेत. त्यापैकी एक वेस्टन असलेले पाकिट् उघडले असता त्यात पाने, फुले, फळे आणि बिया मिश्रित हिरव्या रंगाचा वनस्पती ओलसर गांजा दिसून आले. वरिष्ठांचे दिशा निर्देश सूचनाप्रमाणे जप्तीची सविस्तर प्रक्रिया करण्यात आली.
आरोपी सतीश दीनानाथ उपाध्याय वय 25 वर्षे याचे ताब्यातून 28 किलो 120 ग्रॅम गांजा, दोन ट्रॉली बॅग, एक स्ल्याग बॅग असा किंमती एकूण 8 लाख 68 हजार 630 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, आरोपी सतीश दीनानाथ उपाध्याय वय 25 वर्षे व 2) फरार आरोपी नामे- भोला प्रकाश यादव वय 20 वर्षे रा. दोन्ही तीलवारा घाट, ता. गोरखपुर, जिल्हा – जबलपूर (म.प्र.) यांचे विरूध्द पोलीस ठाणे – रामनगर येथे एन. डी. पी. एस. कायदा कलम 8 (क) , 20, 29 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. संजय तुपे, मपोउपनि- वनिता सायकर, पोलीस अंमलदार राजेन्द्र मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, नेवालाल भेलावे, तुळशीदास लुटे, छगन विठ्ठले, संतोष केदार, राम खंदारे, लक्ष्मण बंजार यांनी कारवाई केली आहे..